Home Breaking News सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी...

सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन

61

सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन
साखरखेर्डा lप्रतिनिधी
समाज हा अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा  फुले यांनी एक सत्यशोधक नावाची चळवळ  तीच चळवळ आजही सत्यपाल महाराज चालवीत आहे . असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी साखरखेर्डा येथील महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त केले .
आज सत्यपाल महाराज त्यांच्या राष्ट्रीय  कीर्तनातून त्यांच्या समोर प्रबोधनातून जे आज सांगतात त्या काळामध्ये हेच सांगण्याचं काम महात्मा ज्योतिबा  फुले यांनी केले .  सत्यशोधक चळवळ ही  समाजातल्या अनिष्ट चालीरीती असतील ,  समाजामध्ये जे काही खर्चिक उपक्रम आपण त्या ठिकाणी ऐपत नसताना करतो ते असतील , विनाकारण आपण चुकीच्या ठिकाणी आपला वेळ आणि पैसा गमावतो या गोष्टी असतील त्या आपल्यासारख्या शेतकरी वर्गांना कष्टकरी वर्गाने ह्या करायला नको हा खरा उपदेश त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा  फुले यांनी केला .  त्यांनी शेतकऱ्याचा आसूड नावाचा सुद्धा एक ग्रंथ  त्यांनी लिहिला .  म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये आर्थिक परिस्थिती त्या काळामध्ये म्हणा किंवा आताही अतिशय चांगली नसते .  पण या समाजामध्ये आपण जे काही अनाठही आपला खर्च करतो अनाठही आपलं मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न करतो . खर्च आणि कार्यक्रम करत असताना एकमेकांशी आपण स्पर्धा करतो याच गोष्टींवर त्यांचं त्या काळामध्ये सुद्धा लोकांमध्ये समाज प्रबोधन हसायचं .  तुम्हाला माहिती आहे की आपल्या परिसरामध्ये महात्मा ज्योतिबाराव फुले यांच्या विचाराचे दोन खंदे पुरस्काराचे आपल्या भागातले होते .  या सत्यशोधक चळवळीचा प्रचार आणि प्रसार आपली चिखलीचे त्या काळातले खासदार असलेले पंढरीनाथ पाटील आणि दुसरे  त्यांच्या विचाराचे शिष्य होते ते म्हणजे आपल्या मेहकरचे दलित मित्र समाज भूषण आयाजी पाटील .त्याच्या काळातल्या जनपद चे अध्यक्ष .  या दोघांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ या समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला .  आपल्या अनेक लोकांना माहीत असेल की आपल्या इकडच्या तेराव्या या मोठ्या प्रमाणामध्ये बंद करण्यामध्ये हे महात्मा ज्योतिबा  फुले यांचे विचार होते .  की मेल्यानंतर त्या व्यक्तीसाठी खर्च केल्यापेक्षा तो जिवंत असताना त्याच्या सेवेसाठी तुम्ही खर्च करा ,    चार तासांमध्ये लग्न ,  लग्नामध्ये पंगती नको ,  बडे जाव नको ,  फक्त चहा , शरबतावर सुद्धा हजारो लग्न आपल्या या परिसरामध्ये मेहकर , साखरखेर्डा ,  चिखली , बुलढाणा या परिसरामध्ये जे जे त्यांचे अनुयायी होते  त्यांच्या विचारांचे लोक होते  , त्यांनी मोठमोठ्या श्रीमंत घराण्यातले सुद्धा लग्न अगदी चहावर आणि शरबतावर चार चार तासांमध्ये ,  कुठेतरी एखाद्या मंदिरावर ,  धार्मिक शाळेत ,  किंवा एखाद्या शाळेमध्ये हे कार्यक्रम त्याठिकाणी झालेले आहे  . आणि तो काही फार जुना काळ नाही तो काळ होता जवळपास ७० ते ८० चा  . त्या काळामध्ये आमच्या इकडच्या शेतकऱ्यांचे मुख्य पीक होते कपाशी आणि त्या कपाशीमुळे आमचा शेतकरी इतका हलाखीचा झाला होता की प्रत्येकाला कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर कर्ज काढावं  लागायचं .  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य गोरगरीब दिन दलितांच्या कल्याणासाठी खर्ची घातलं .  या देशाला एक आदर्श अशी चांगली घटना त्यांनी संविधान आपल्याला दिलं .  डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे मी अनेक लोक पाहतो  , पण ज्यावेळेस बारकाईने विचार करतो की यांच्यातले किती लोक बाबासाहेबांच्या विचाराला मानतात . आज प्रत्येक व्यक्तीने यांचे विचार आचरणात आणले तर समाज सुधारेल असे प्रतिपादन प्रतापराव जाधव यांनी केले .
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, युवासेना नेते योगेश जाधव , युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर , माजी सरपंच महेंद्र पाटील , माजी सरपंच कमलाकर गवई , माजी उपसभापती सुनील जगताप , युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर, चंद्रशेखर शुक्ल,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिलीपराव बेंडमाळी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष मंडळकर,ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, संतोष राजपूत, आशिष पोंधे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते . सर्वप्रथम केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांच्यासमोर नतमस्तक झाले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वशीष्ट खरात, पत्रकार संतोष गाडेकर यांनी केले.

Copyright ©