साखरखेर्डा : (प्रतिनिधी) बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या मेहकर आगाराने वाक्याला अक्षरशः तिलांजली दिल्याचा प्रकार आज येथील बस स्थानकावर पहायला मिळाला. या संदर्भात सविस्तर असे की, मेहकर पुणे ही बस क्र एम एच ४०-व्ही ५७५१ दररोज सकाळी साखरखेर्डा येथून सकाळी ७ वाजता नियमित जात असल्याने आज दि ७ एप्रिल रोजी सदर बस साखरखेर्डा बसस्टॉपवर हजर झाली. दरम्यान चालक एस एस निकम यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी सदर माहिती मेहकर आगाराचे सहा. वाहतूक निरिक्षक राकेश चौधरी यांना कळविली. मात्र चौधरी यांनी बदलीचे चालक एस यू घुबे यांना तब्ब्ल चार तास उशीरा म्हणजेच ११ वाजता पाठविले त्यामुळे पुणे जाणाऱ्या सुमारे ४० प्रवाशांना तब्ब्ल ४ तास प्रतिक्षा करावी लागल्याने वाहतूक निरीक्षक अतुल सोनवणे यांच्या विषयी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
🔸 प्रकृती स्थिर नसल्याने लादली ड्यूटी 🔸 मेहकर पुणे बसचालकाची प्रकृती स्थिर नसल्याची तक्रार चालक एस एस निकम यांनी रात्रीच सहा वाहतूक निरिक्षक राकेश चौधरी यांचेकडे केली होती मात्र प्रवाशांचा देव समजल्या जाणाऱ्या चालकावर दबाव आणून ड्यूटी करावीच लागते म्हणून जबरीने त्यांना पाठविण्यात आले. नोकरीत कसूर नये म्हणून चालकाने आपले कर्तव्य बजावले मात्र रापम चालकांना किती छेळतेय याची प्रचिती आली.
🔸 प्रवाशांना वाऱ्यावर सोडले मेहकर आगाराने 🔸 कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांना देखील वेठीस धरले. मेहकर पुणे बस साखरखेर्डा बसस्टॉपवर सकाळी सात वाजता बरोबर हजार झाली चालकास अस्वस्थ वाटू लागल्याने लागलिच त्यांनी ही माहिती सहा वाहतूक निरिक्षक राकेश चौधरी यांना दिली चौधरी यांनी दोन तास उशीराने कारवाई सुरू केली. त्यांनी नऊ वाजता पर्यायी चालक एस यू घुबे यांना फोन केला सकाळी अकरा वाजता घुबे आपल्या कर्तव्यवर ऋजू होत बस पुण्याकडे रवाना झाले.
🔸 प्रवाशांनीच केले चालकास भरती 🔸
मेहकर पुणे बसचालकाची प्रकृती बिघडली असता तातडीने बसस्टॉपवर असलेल्या सर्जेराव मंडळकर यांनी चालकास दवाखान्यात भरती करण्याचे औदार्य दाखवले. सध्या प्रकृती स्थिर असली तरीही मेहकर आगाराने अजिबात ढूकूंनही बघितले नाही. पुणे जाणाऱ्या प्रवाशांची अक्षरशः पाच तास त्रेधातिरपीट उडाली.
◾ही बस आमच्या शहरासाठी मोठी सुविधा आहे. मेहकर पुणे बसचालकाची प्रकृती बिघडली असता तातडीने मेहकर आगाराने दखल घेणं गरजेचं होतं मात्र चालकाबरोबरच प्रवाशांच्या जीवनाशी खेळणाऱ्या सबंधितांवर विभागीय नियंत्रकांनी गंभीर पाऊले उचलली पाहिजेत. -ललितकुमार अग्रवाल व्यापारी, साखरखेर्डा