Home Breaking News साखरखेर्डा येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी : शोभायात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय

साखरखेर्डा येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी : शोभायात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय

24

साखरखेर्डा येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी :
शोभायात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय

🔸असलम अंजुम 🔸

साखरखेर्डा :  येथील रामजन्म उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढून श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
स्थानिक श्रीराम मंदिरात सकाळी ५:४५ वा. काकड आरती, ८ वा. अभिषेक, ९ वा. नामजप, दुपारी ११:४५ वा. जन्माचा अध्याय, १२ वाजता जन्म व गुलाल, आरती आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजता
पारंपारीक पद्धतीने वाजत – गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम मंदीर ते प. पू. प्रल्हाद महाराज मंदीर शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी सुवासिनींनी सडासमार्जन करुन रांगोळ्या काढल्या होत्या. मिरवणूक ग्रामपंचायत भावनासमोर येताच फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात येऊन सरपंच सौ.ज्योती अमित जाधव यांनी श्रीराम मूर्तीची पाद्यपूजा करुन औक्षण केले. जिप चे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, पपू प्रल्हाद महाराज संस्थानाचे उपाध्यक्ष रावसाहेब देशपांडे, माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल, महेंद्र पाटील, रामदाससिंग राजपूत, दिलीप बेंडमाळी, संदीप खिल्लारे, संतोष जयस्वाल, श्रीनिवास खेडेकर, संग्रामसिंग राजपूत, देवानंद खंडागळे, सुधाकर पऱ्हाड, संतोष मंडळकर, आदी मान्यवरही दर्शन घेऊन मिरवणूकीत सहभागी झाले होते.
यावेळी मुस्लिम समाजातून माजी सरपंच दाऊदसेठ कुरेशी, माजी उपसरपंच सैय्यद रफीक, असलम अंजुम, ग्रामपंचायत सदस्य शेख युनूस दिवान, इब्राहीम शाह, आदींनी शोभयात्रेवर पुष्पवृष्टी करत शोभयात्रेचे स्वागत केले.
दरम्यान माजी सरपंच तथा शिवसेना नेते महेंद्र पाटील यांच्या वतीने एक क्विंटल साखरेची सरबत बनवून रामभक्तांना वाटप करण्यात आली. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी रामनवमी मिरवणूकीत सपरिवार सहभागी होऊन मनोभावे पुजा केली. तदवतच केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या वतीने त्यांचे पुतणे तथा शिवसेना नेते योगेश भाऊ जाधव यांनीही उपस्थित राहून समस्त रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे रामजन्म उत्सव समितीचे आयोजक मंगलसिंग मोहने, रावसाहेब देशपांडे, सीताराम काळे, देवेंद्र देशपांडे, संतोष जयस्वाल, गोपाल पाझडे, गोपाल शिराळे, मयुर जयस्वाल, आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून सामान्य लोकांना डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून शोभायात्रेत पारंपारिक पद्धतीचे ढोल – ताशे वाजविण्यात आले. तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी मुस्लिम समाजातील महत्वाच्या व्यक्तींना या शोभायात्रेचे निमंत्रणही देण्यात आले होते.
श्रीराम नवमी शोभायात्रेत महिलांची हजेरी ही लक्षणीय होती. यावेळी महिलांची पारंपारिक फुगडी मिरवणूकीचे मुख्य आकर्षण ठरली. समारोपीय आरती ठाणेदार गजानन करेवाड यांनी केली. एकंदरीत ही मिरवणूक डीजेमुक्त आणि सामाजिक सलोखा राखत भक्तीमय वातावरणात पार पडली. शोभायात्रा मिरवणूकीदरम्यान ठाणेदार गजानन करेवाड यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनीही मिरवणूकीला भेट दिली. एकंदरीत साखरखेर्डा येथील श्रीराम नवमी उत्सव भक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

Copyright ©