Home Breaking News आठवडी बाजारात आग्या मोहळाचा धुमाकूळ व्यापाऱ्यासह ग्राहकांची तारांबळ, अनेकांना केला दंश दोघांनी...

आठवडी बाजारात आग्या मोहळाचा धुमाकूळ व्यापाऱ्यासह ग्राहकांची तारांबळ, अनेकांना केला दंश दोघांनी वाचवले प्राण

18

आठवडी बाजारात आग्या मोहळाचा धुमाकूळ
व्यापाऱ्यासह ग्राहकांची तारांबळ, अनेकांना केला दंश
दोघांनी वाचवले प्राण

साखरखेर्डा (प्रतिनिधी): गेल्या दोन
दिवसांपासून साखरखेर्डा येथील आठवडी बाजारात आग्या मोहळाने धुमाकूळ घातला असून अनेकांना देश केल्याने बाजारात तारांबळ उडाली होती. लोक सैरावैरा पळू लागले होते उपरोक्त घटना आज २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता घडली. आज आठवडी बाजार असल्याने किरकोळ व्यापारी आपली दुकाने मांडून ग्राहक करीत असताना आठवडी बाजारातील महा वृक्षावरील आग्या मोहळ उठले काही समजण्यापुर्वीच आग्या मोहळाच्या माशांनी अनेकांना देश केल्याने व्यापाऱ्यासह ग्राहक बचावासाठी सैरावेरा पळू लागले तो पर्यंत अनेकांना दंश केल्याने १५ ते २० नागरिक जखमी झाले त्यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. काल १९ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बैंक शाखा साखरखेडा येथील गच्चीवरील आग्या मोहळ उठल्याने एका वयोवृद्ध व्यक्तीवर हल्ला केला व्यक्ती गंभीर जखमी झाला झिने नामक परिसरातील

नागरिकांनी धावत जाऊन त्यांच्या अंगावर चादर ओढून बचाव करण्याचा प्रयत्न केला असता समय सुचकता बाळगून दत्तकृपा लॅबचे संचालक दत्ता खरात, सचिन खराडे यांनी झिने यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले त्यानंतर तेथे उपचार करून बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. साखरखेर्डा गावात अनेक ठिकाणी आग्या मोहळ दिसून येत असून त्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Copyright ©