Home Breaking News भीमजयंती मिरवणूकीत मुस्लिम तरुणांकडून सरबत वाटप : सामाजिक सलोख्याचे अप्रतिम दर्शन

भीमजयंती मिरवणूकीत मुस्लिम तरुणांकडून सरबत वाटप : सामाजिक सलोख्याचे अप्रतिम दर्शन

186

भीमजयंती मिरवणूकीत मुस्लिम तरुणांकडून सरबत वाटप : सामाजिक सलोख्याचे अप्रतिम दर्शन

साखरखेर्डा : (असलम अंजुम) आज संपूर्ण देशात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती जल्लो्षात साजरी करण्यात आली. साखरखेर्डा येथेही भीमजयंती उत्सव समितीच्या वतीने गावातून भव्य – दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. भीमनगरातून निघालेली मिरवणूक संताजी नगर, दगडी मशिद मार्गे दुपारच्या रखरखत्या उन्हात गुजरी चौकात पोचली आणि जाफ्राबाद मोहल्ल्यातील मुस्लिम तरुणांनी मिरवणूकीचे स्वागत थंडगार सरबत वाटपाने केले. एव्हढेच नव्हे तर डीजेत “चला… चला… रे चला मेरे ताज का संदल…” हे गाणे लागताच गुजरी चौकात मिरवणूक पाहण्यासाठी उभे असलेल्या मुस्लिम युवकांनीही डीजेच्या तालावर चांगलाच ठेका धरला. यामुळे मिरवणूकीतील वातावरण आणखीनच जल्लोषमय झाले. तर दुसरीकडे तहानेने व्याकुळ झालेली अबाल – वृद्ध, तरुण, महिला – पुरुष थंडगार सरबतचा घोट घेत तृप्त झालेले दिसले. यानिमित्ताने भीमजयंती उत्सवात सामाजिक सलोख्याचे अप्रतिम असे दर्शन घडले. यांत असलम शाह, यूनुस शाह, रीजवान कूरेशी, अशफाक शाह, आसिफ कूरेशी, मुजफ्फर कुरेशी, तैजीफ शाह, ईबराहीम शाह,
जूबेर शाह, रिजवान शाह, शे फैजान, शे अतीक,
वसीम शाह, रेहान शाह, शे फारुक, अकरम शाह, शे अखतर ड्रायव्हर, शे मुफीज, अफजल शाह, शे मकसूद, शे फारुक, अफजल शाह आदी युवकांनी स्वखर्चातून सरबत बनविण्याचे नियोजन करुन वाटपाचीही जबाबदारी पार पाडल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तसेच भीमजयंती उत्सव समितीच्या वतीनेही त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Copyright ©