प्रतिनिधी बापूसाहेब कापुरे
पारडी येथील विठ्ठल दूध डेअरीचा शुभारंभास दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांचा मोठा प्रतिसाद
लोहा तालुक्यातील पारडी येथील विठ्ठल दूध डेअरीच्या शुभारंभास दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १२.०० वाजता विठ्ठल दुध डेअरीची पुजा विठ्ठल दुध डेअरीचे चेअरमन बाळू पाटील डिकळे पारडीकर यांच्या हस्ते विधिवत पुजा करून संपन्न झाली. यावेळी अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत विठ्ठल दूध डेअरीचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर देवून सर्व सामान्यांची सेवा करण्याचा संकल्प यावेळी डिकळे यांनी व्यक्त केला. परिसरातील नागरिकांना शुद्ध,ताजे,निके दुध मिळेल. तसेच दुग्धजन्य पदार्थ दही पनीर तूप आदी पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण होय.यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला. यावेळी कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जि .प सदस्य संजय भोसीकर, शिवसेनेचे नांदेड दक्षिण तालुकाप्रमुख बाबुराव मोरे, काँग्रेसची माजी नगरसेवक शरपोद्दीन शेख, नगरसेवक जीवन पाटील चव्हाण, वाळकेवाडीचे सरपंच पांडुरंग वाळके, शेलगाव चे सरपंच मारुती पाटील कदम,माजी सरपंच दिगंबर पाटील डिकळे, माजी सैनिक उद्धव पाटील डिकळे, मन्याड फाउंडेशनचे पांडू पाटील लोंढे, चेतन पवार, सटवा आप्पा चौकले, करण सूर्यवंशी,पोलीस पाटील विनायक मटके, शालेय व्यवस्थापन समितीचे विठ्ठल पाटील डिकळे,काळेश्वर किरवले,नामदेव चव्हाण,सतीश चव्हाण,गोविंद रमण, पांडुरंग पाटील पवार, रामचंद्र पाटील डिकळे,बालाजी मटके,गोविंद पवार,परिसरातील सोनखेड, पेनुर कलंबर सर्कल मधील पारडी वाळकेवाडी,सायाळ,पांगरी, शिवणी(जा.), कारेगाव, पिंपळगाव ढगे, शेलगाव, धानोरा, पोखरभोसी,निळा यांसह परिसरातील आजुबाजुच्या गावांतील शेतकरी बांधव उपस्थित होते.
