यवतमाळ:-पुरुषोत्तम कामठे
शासकीय रुग्णालयातील प्रसाधन गृहाची दैनीय अवस्था रुग्णाचे आरोग्य धोक्यात
यवतमाळ:-येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालंय व रुग्णालंय,यवतमाळ या ठिकाणी आयसोलेशन वार्ड क्र 27,28 या वार्डातील प्रसाधन गृहाची अवस्था काही अश्या प्रकारची झालेली आहे.की या ठिकाणी आजारी रुग्ण बरे होण्या साठी येतात परंतु या घाणी मुळे त्यांची प्रकृति आणखी ढासळत आहे तर रुग्णांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांचे पण स्वास्थ्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. रग्ना सोबत राहणारे पुन्हा रुग्ण तयार होत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने सर्व सामान्यांच्या जीवावर बेतत आहे, रुग्णालयातील अनेक प्रसाधान गृह घाणीने तुंबले असून जे स्वच्छ आहे.ते फक्त अधिकाऱ्या न करीता व कर्मच्याऱ्या करीता, ज्यांच्या करीता रुग्णालय आहे त्यांचे कुणालाही काही घेणे देणे नाही. विशेष म्हणजे स्वच्छताहि केली जाते त्यांच्याच प्रसाधान गृहांची स्वच्छतेच्या नावणे संपूर्ण रुग्णालयाच्या सफाई साठी खरीदी केल्या जाणाऱ्या सामग्री 25% रुग्णलयात आणी 75% सामग्री कर्मचाऱ्याच्या घरात ,यात त्यांच्या घराच्या सफाई केल्या जाते याची तपासणी करायला कुणालाही वेळ नाही,कारण चोर चोर मावशेरे भाई अशी अवस्था या रुग्णालयाची झाली आहे.या कडे जिल्हा अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे लोकप्रतिनिधी तर फिरकूनही पहात नाही सर्वसामान्यांचा कुणी वालीच नाही.
