Home यवतमाळ अंशकालीन स्त्री परिचर यांना आरोग्य सेवेत कायम करा 

अंशकालीन स्त्री परिचर यांना आरोग्य सेवेत कायम करा 

13

अंशकालीन स्त्री परिचर यांना आरोग्य सेवेत कायम करा 

आयटकची मागणी

यवतमाळ  महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटना आयटक जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांना मागण्यांचे निवेदन पाठविले आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्राच्या ठिकाणी नर्सेस ना मदत करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचरांना त्यांच्या कामाच्या तुलनेत मीळनारे एकत्रीत मानधन निव्वळ तुटपुंजे असल्यामुळे त्यांच्यावर वेठबिगारीचे जिवन जगण्याची पाळी आली आहे. यापूर्वी अनेक वेळा आंदोलन करून अंशकालीन स्त्री परिचरांना आरोग्य खात्यात कायम करा रू.१८०००/– वेतन द्या अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दि.२० अॉगस्ट २०१४ रोजी मा.आरोग्य संचालक मुंबई यांनी अंशकालीन स्त्री परिचरांना रू.१००००/– देण्यात यावे अशी शिफारस केली आहे.मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे.दि.२८ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर विधानसभेवर मोर्चा काढला त्यावेळी शिष्टमंडळाला मा.मुंख्यमंत्री यांनी आस्वासन दिले होते. मुंबई मंत्रालयात संघटने सोबत मींटीग लावून मानधन वाढ करण्यात येईल.परंतु ‌अजुनपर्यंत त्याची पुर्तता करण्यात आली नाही म्हणून शासनाचे लक्ष वेधण्याकरीता १० फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेवर निदर्शने आंदोलन करण्यात आले मागण्या अंशकालीन स्त्री परिचरांना आरोग्य खात्यात कायम करा , दरमहा किमान वेतन रू.१८०००/– द्या.अंशकालीन स्त्री परिचर ह्या अर्धवेळ असुन त्यांचे कडून आरोग्य कर्मचारी पुर्णवेळ कामे करून घेतली जातात त्यामुळे त्यांना पुर्णवेळ कर्मचारी करा , वारसांना सेवेत घ्या,पेन्शेन योजना लागू करा , गणवेश द्या, इत्यादी मागण्या केल्या आहे यावेळी कॉ.दिवाकर‌ नागपुरे,पार्वती दाते, मंदा कांबळे, शोभा वावरे, जनाबाई पळवेकर, सुमनबाई कोरे, मंदा राऊत,देवकाबाई मोहरकर, संगिता म्हैसकर,कमल मेंडके, बेबीताई गायकवाड, सुवर्णा सोनुने,लता नगराळे, शोभा मेश्राम, कल्पना कुचनकर , सुनीता चेन्हुजवार, सुनीता कोंडापे, मंगला मडावी,यासह अनेक महीला उपस्थित होत्या.

Copyright ©