अंशकालीन स्त्री -परिचरांना जिल्हा परिषदेतर्फे ड्रेस कोड (युनिफॉर्म) द्या — कॉ.दिवाकर नागपुरे, कार्याध्यक्ष,आयटक
आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री -परिचर संघटनेचे जिल्हा सचिव तथा कार्यध्यक्ष , आयटक कॉ.दिवाकर नागपुरे यांनी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी ,व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद यवतमाळ यांचे कडे अंशकालीन स्त्री-परिचरांना ड्रेस कोड (युनिफॉर्म) देण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाव्दारे केली आहे त्यात म्हटले आहे महाराष्ट्रात अनेक जिल्हा परिषदने अंशकालीन स्त्री -परिचरांना ड्रेस कोड व ओळख पत्र दिले आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री -परिचरांना ड्रेस कोड (युनिफॉर्म) व ओळख पत्र अद्याप देण्यात आले नाही, हा आमचेवर एक प्रकारे अन्यायच आहे म्हटले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत इतर कर्मचारी असो की, आशा व अंगणवाडी सेविका असो त्यांना ड्रेस कोड दिल्या जाते; परंतु अंशकालीन स्त्री-परिचरांना ड्रेस कोड( युनिफॉर्म) व ओळख पत्र दिले जात नाही त्यामुळे त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नसुन अपमानजनक वागणुक मिळत आहे.ही बाब आपण विचारात घेवून जिल्हा परिषदेच्या फंडातून ड्रेस कोड (युनिफॉर्म) ची मागणी निकाली काढावी असी विनंती केली आहे. तसेच महाराष्ट्र गडचिरोली, चंद्रपूर, कोल्हापूर, शिंदुदुर्ग या सह अनेक जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या अंशकालीन अंशकालीन स्त्री परिचरांना ड्रेस कोड (युनिफॉर्म) देण्यात आले आहे.त्याच प्रमाणे यवतमाळ जिल्हा परिषदेकडून अंशकालीन स्त्री परिचरांना ड्रेस कोड युनिफॉर्म देण्यात यावा अशी मागणी कॉ.दिवाकर नागपुरे, कार्याध्यक्ष आयटक यांनी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी पार्वती दाते, मंदा कांबळे, शोभा वावरे, जनाबाई पळवेकर, सुमनबाई कोरे, मंदा राऊत,देवकाबाई मोहरकर, संगिता म्हैसकर, कमलबाई मेंडके, बेबीताई गायकवाड, सुवर्णा सोनुने,लता नगराळे, शोभा मेश्राम, कल्पना कुचनकर , सुनीता चेन्हुजवार, सुनीता कोंडापे, मंगला मडावी, इत्यादी उपस्थित होत्या
