Home यवतमाळ 13 फेब्रुवारी रोजी गणेश नगर उमरसरा येथे गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवानिमित्त विविध...

13 फेब्रुवारी रोजी गणेश नगर उमरसरा येथे गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

9

13 फेब्रुवारी रोजी गणेश नगर उमरसरा येथे गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ : राजुभाऊ बोडखे मित्र मंडळ व योगीराज बहुउद्देशीय संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश नगर विद्यानगरी उमरसरा येथे श्री संत गजानन महाराज प्रगटदिन उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संदर्भात दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता कलशस्थापना व पुजन, सकाळी ९ ते ४ आयुष्यमान भारत योजने अंतर्गत कार्ड कॅम्प, दुपारी ४ वाजता उत्साही महिला भजन मंडळ, व रात्री ८ वाजता श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ प्रेरणा नगर यवतमाळ यांच्या भजनांचा कार्यक्रम तर दिनांक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता श्री नंदादिप महिला भजनी मंडळ व दुपारी २ वाजता संताजी महाराज महिला मंडळ जगत मंदिर तर रात्री ८ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार श्री हभप ऋषीश्वर गिरी महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम तर दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रीच्या पालखीचे आयोजन उमरसरा परिसरातील प्रमुख मार्गाने श्रीच्या पालखीची मिरवणूक तर सायंकाळी ५ वाजता श्रींची आरती, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी ६वाजता परिसरातील गरिब होतकरू शालेय विद्यार्थी व दिव्‍यांगांना सायकल वाटपाचा कार्यक्रम लोकप्रिय आमदार मदनभाऊ येरावार यांच्या शुभहस्ते बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, बाळासाहेबांची शिवसेना संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख कालींदाताई पवार, बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी प्रमुख माधुरीताई अराठे, पराग पिंगळे माजी जिल्हा प्रमुख, माजी सभापती दिनेशभाऊ चिंडाले, माजी विरोधीपक्षनेते चंद्रशेखर चौधरी, बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख निलेशभाऊ बेलोरकर यांच्या उपस्थितीत सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी निमंत्री व स्नेहीजनांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राजु बोडखे मित्र मंडळ व श्री योगीराज बहुउद्देश संस्था व प्रगट दिन आयोजन समिती गणेशनगर विद्यानगरी, उमरसरा यवतमाळ यांनी केली आहे.

Copyright ©