हिवरी येथे खुल्या कबड्डी स्पर्धाचे आयोजन
हिवरी येथील कबड्डीचे प्रेक्षणीय खुले सामन्याचे आयोजन बबन लक्ष्मणराव चेके यांच्या वाढदिवसा प्रीतीर्थ नेहरू युवा क्रीडा मंडळ व शहीद आदिवासी गोवारी संघ यांच्या वतीने भव्य आयोजन केले आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा. बाळासाहेब मांगुळकर नितीन भाऊ मिर्झापुरे नारायण भाऊ राठोड माननीय अनिलजी धकाते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या यावेळी रमेशभाऊ भीसणकर चिमूभाऊ तिवारी, अशोक खोडकुंभे, तुकाराम शहारे दिगंबर शहारे ऋषभमाहुरे,सुभाष मडावी,दिलीप भगत,यावेळी विशेष अतिथी उपस्थित होते ही स्पर्धा 7 फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात आली असून प्रथम पारितोषिक 20000, द्वितीय 15000 तृतीय दहा हजार आणि चतुर्थ सात हजार एक व विशेष वैयक्तिक बक्षीस देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे संचालन विशाल बोरकर यांनी केले यावेळी माजी खेळाडू ज्ञानेश्वर कोहरे, ज्ञानेश्वर वाघाडे, गजानन शहारे, इत्यादींचा सन्मान करण्यात आला तर लहान विद्यार्थी विद्यार्थिनींचा नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला.
