युवकाने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
कर्णेश्वर मंदिराजवळील घटना
दिग्रस कर्णेश्वर मंदिराजवळ असलेल्या ले- आऊट जवळील विहिरीत एका ३० वर्षीय युवकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मृतक अजय नागेश जुमनाके (वय -३०) रा. आदीलाबाद हा दिग्रस अभिराजनगर येथे वास्तवास असलेले सासरे विलास पवार यांच्याकडे आपल्या पत्नी सोबत दीड वर्षांपासून राहतो. तो मानसिक रुग्ण असून अशा परिस्थितीत त्याने कर्णेश्वर मंदिर जवळील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा नगर परिषद चौकीदार महंमद हसन परसुवाले यांनी दोरीच्या सहाय्याने मृतदेहाला विहिरी बाहेर काढून दिग्रस ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी फिर्यादी मृतकाचे वडील नागेश किसन जुमनाके रा. आदीलाबाद यांनी मृतक अजय जुमनाके हा मानसिक रुग्ण असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहकारी करीत आहे. या आधी सुद्धा या लेआऊट मधील विहिरीत एका युवकाचा पडून मृत्यू झाला होता. तेव्हा विहिरीला ले आऊट मालकाने जाळी बसविल्यास अशा घटनांना लगाम लागेल अशा चर्चला उधाण आले होते.



