Home यवतमाळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थे कडून प्रशिक्षण सुरू

औद्योगिक प्रशिक्षण संस्थे कडून प्रशिक्षण सुरू

10

औद्योगिक प्रशिक्षण संस्थे कडून प्रशिक्षण सुरू

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथील वीजतंत्री द्वितीय वर्षाचे एकूण वीस प्रशिक्षणार्थी हे 150 तास ऑन जॉब ट्रेनिंग करिता तुमसरे इलेक्ट्रिकल्स यवतमाळ येथे रुजू झाले. सदर प्रशिक्षण हे दिनांक 3 फेब्रुवारी 2023 ते 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत देण्यात येणार आहे. संस्थेचे प्राचार्य व्ही जे नागोरे , शिल्प निदेशक एस एम पोटे व एस पी देऊळकर यांच्या पाठपुराव्यामुळे हे प्रशिक्षण देणे शक्य होत आहे अशी प्रतिक्रिया तुमसरे इलेक्ट्रिकल्स चे व्यवस्थापक सागर महादेवराव तुमसरे यांनी दिली. व तसेच ईलेक्ट्रीक फिटिंग र्वक साठी अनेक विद्यार्थी सहभागी झाले यात सागर महादेवराव तुमसरे, कमलेश मते, विशाल अतकरी,शांतुनु धोटे ईत्यादी उपस्थित होते.

Copyright ©