Home यवतमाळ “ जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला बाल विवाह ”

“ जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला बाल विवाह ”

11

“ जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला बाल विवाह ”

वडील मयत, व जवळच्या नात्यात , चांगले स्थळ आल्याने लग्नाचा घाट मांडण्यात आला होता…

परंतु जिल्हा बाल संरक्षण कक्षाने केली वेळीच कारवाई

 

यवतमाळ:- जिल्ह्यातील सोयीट(म)पो.धानोरा,बिटरगाव ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ या गावी अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होत असल्या बाबत गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाली होती त्या नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे माहिती विश्लेषक सुनिल बोक्से यांनी तातडीने सोयीट(म)पो.धानोरा,बिटरगाव या गावी भेट देण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण कक्षा द्वारे बिटरगाव पोलीस स्टेशन उमरखेड जिल्हा यवतमाळ,व चाईल्ड लाईन १०९८यवतमाळ यांना नियोजित बालविवाह बाबत माहिती देण्यात आली.अल्पवयीन बालिकेच्या कुटुंबास प्रत्यक्ष भेट देऊन बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६व बालविवाह झाल्यास बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत शिक्षेस पात्र होऊ शकते अशी माहिती देण्यात आली. बालिकेच्या मामा कडून बालिकेचा विवाह १८ वर्ष पूर्ण झाल्या नंतर विवाह करणात यावा असा जवाब लिहून घेण्यात आला व त्याप्रमाणे सूचना पत्र आणि बिटरगाव पोलीस स्टेशन उमरखेड जिल्हा यवतमाळ यांच्या द्वारे रे १४९ ची नोटीस सुद्धा देण्यात आली आहे.

सदर बालविवाह थांबविण्यास बिटरगाव पोलीस स्टेशन उमरखेड ,चे सहायक पोलीस निरीक्षक श्री.प्रताप भोस, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे माहिती विश्लेषक सुनिल बोक्से,चाईल्ड लाईन चे टीम मेंबर श्री.दिलीप दाबडेकर व पूनम कनाके गावातील सरपंच श्रीमती कल्पनाताई विनोद नाईक,ग्रामसेवक-शेख फरीद शेख लालम,अंगणवाडी सेविका –सुनिता मारोती खंदारे यांच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती ज्योती कडू, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर जिल्हा परीविक्षा अधिकारी-श्री.रवींद्र गजबिये संरक्षण अधिकारी श्री.अविनाश पिसुर्डे चाईल्ड लाईन चे केन्द्र समण्यवक फाल्गुन पालकर यांच्या मार्गदर्शनात तातडीने कारवाई करण्यात आली.

दिनांक ०५/०२/२०२३ रोजी सोयीट(म)पो.धानोरा,बिटरगाव ता.उमरखेड येथे गावात भेट देऊन दोन्ही कुटुंबातील पालकांना बालिकेच्या मामला बाल विवाह मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह न करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले व अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्षे कारावास होऊ शकते याबाबत माहिती देण्यात आली व मुलीची १८ वर्षे पूर्ण होई पर्यत लग्न करणार नाही असे लेखी हमीपत्र पालकाकडून घेण्यात आले व बालविवाह रोखण्यात आला आहे .

Copyright ©