Home यवतमाळ मोफत सिम कार्ड ग्राहकांना पडणार महागात

मोफत सिम कार्ड ग्राहकांना पडणार महागात

11

मोफत सिम कार्ड ग्राहकांना पडणार महागात

सध्या सिमकार्ड मोठ्या प्रमाणात मोफत वाटप सुरू असल्याने यात ग्राहकांची फसवणूक होण्याचे संकेत मिळत आहे ,काही ठिकाणी एका सिमकार्ड सोबत बुल्यूटूथ मोफत देण्याचे प्रकार सुरू आहे अनेक ग्राहकांची घरी जाऊन सिम मोबाईल मध्ये सुरू करून देण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी रस्त्यावर सिमकार्ड मोफत वाटप करणे सुरू आहे एक सिमकार्ड देऊन त्या सोबतच दोन सिमकार्ड ॲक्टिव्ह करून ते सिम दुसऱ्याला जास्त दराने विकण्याचा गोरख धंदा सुरू करण्यात आला असल्याची चर्चा जोर धरत आहे तर कदाचित सिमकार्ड च्या नावावर आपला डाटाही हि कॉफी होऊ शकतो तर आपले ब्यांक अंकाऊंट सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या मुळे ग्राहकांनी सतर्क राहून आमिषाला बळी न पडता आपणास खात्री असलेल्याच वेक्ति किंव्हा दुकानदारांकडून खरेदी करण्यात यावे जेणे करून आपली फसगत होणार नाही कारण आपण सिम देणाऱ्या वेक्तीस आपले आधार कार्ड,फोटो,आणि थम सुद्धा देतो ह्या तीनही गोष्टी दिल्या मुळे आपल्याला कधी फसवेल याचा नेम नाही करीता प्रत्येकानी सावध होऊन कोणतेही वस्तू खरेदी करताना जागरूक राहणे आवश्यक आहे,

Copyright ©