प्रसूती दरम्यान माता मृत्यू चा आकडा वाढतीवर माता मृत्यू ला जवाबदार कोण?
यवतमाळ:-श्री वसंतरावं नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालंय ,यवतमाळ या ठिकाणी सिनिअर डॉक्टरांच्या दुर्लक्ष मुळे आल्या दिवसात जास्तीत जास्त प्रसूती दरम्यान माता मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात माता मृत्यू होत असूनही वरिष्ठांचेसुद्धा या कडे दुर्लक्ष आहे सिनिअर डॉक्टर आपल्या खाजगी रुग्णाल्यात व्यस्त असून शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागाची संपूर्ण जबाबदारी शिकाऊ डॉक्टरांच्या हातात दिलेली आहे शिकाऊ डॉक्टरांना जिथे समजले नाही तिथे शिकाऊ डॉक्टर फोटो काढून आपल्या सिनिअर डॉक्टरांना पाठवतात व सिनिअर डॉक्टर फोटो पाहून पुढील उपचाराची माहिती देत आहे.या दरम्यान मातेची प्रकृती गंभीर असल्याने तात्काल उपचार न मिळाल्याने माता व शिशु दोघांनाचाही जीव धोक्यात पडतो या मुळे काही माता शिशु यम सदणी जाऊन परत येते तर काही यमसदणी जाते ही बाब निदर्शनास घेत काही रुग्णांनी प्रसुति साठी खाजगी रुग्णालंय व्यवस्तीत समजून खाजगी रुग्णालयात प्रसूती करणे योग्य समजत जीवाच्या धाकाने खाजगि रुग्णालयात जाणारे पण मोठे संकटात पडत आहे कारण तिथे त्यांना मोठी रक्कम मोजून द्यावी लागत आहे.व विनाकारण सामन्य प्रसूती ऐवजी सिजर करून घ्यावे लागत आहे.सिजर करण्यामागील कारण असे की सामन्य प्रसूती मागे खाजगी डॉक्टरांना फार शे बिल काढणे कठीण जाते.सर्व सामान्य अनेक सकटाचा सामना करीत आहे आणि शासकीय रुग्णालयात माता बरोबर शिशु मृत्यू चा पण समानच आकडा असल्याचेही दिसून येत आहे.याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.



