Home यवतमाळ स्टील ग्लास बाळगा- प्रदूषणमुक्त जीवन जगा

स्टील ग्लास बाळगा- प्रदूषणमुक्त जीवन जगा

13

स्टील ग्लास बाळगा- प्रदूषणमुक्त जीवन जगा

बोधिसत्व खंडेराव याचे अभियान.

: यवतमाळ जिल्ह्यातील बोधिसत्व खंडेराव याने “स्टील ग्लास बाळगा- प्रदूषणमुक्त जीवन जगा” हे अभियान सुरू केले आहे, बोधिसत्व खंडेराव याने सांगितले की,

“कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर, अर्धा ग्लास पाणी पिऊन आपण सहजपणे प्लास्टिक ग्लास तिथे फेकून देतो.

तिथे पडलेला प्लास्टिकच्या कपांचा आणि ग्लासांचा ढीग पर्यावरणासाठी घातक आहे.”

“प्रवासात सहजपणे पाण्याची बाटली खरेदी करतो आणि थोडे पाणी पिऊन उरलेल्या पाण्यासह बाटली कुठेही टाकून देतो. या प्लास्टिकच्या बाटल्या आणि ग्लासांचे विघटन होण्यासाठी एक हजार वर्षे लागतात. आपण पृथ्वीचे हजार वर्षांचे काम वाढवून ठेवतो, म्हणजेच येणाऱ्या पिढीसाठी आपण हजारो वर्षांचे प्रदूषण तयार करून ठेवतो.”

“एका लहानशा चांगल्या सवयीमुळे आपण हे प्रदूषण टाळण्यास हातभार लावू शकतो.”

“घरातून बाहेर पडताना किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी जाताना स्वतःचा एक लहानसा स्टील ग्लास नेहमी जवळ बाळगा. घराबाहेर चहा-कॉफी-सरबत किंवा पाणी पिण्यासाठी स्वतःचाच ग्लास वापरा.”

ही लहानशी सवय येणाऱ्या पिढ्यांना प्रदूषण मुक्त जीवन देण्यासाठी मदत करू शकते.

यामुळे साथीच्या आजारांपासून बचाव होईल, पाण्याचा अपव्यय टाळता येईल, जमीन प्रदूषणास आळा बसेल, भटक्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जाणार नाही, भूगर्भातील जलसाठ्याचे प्रदूषण टळण्यास मदत होईल.

5 जून रोजी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना 30 रुपयांचा एक स्टील ग्लास देऊन सिंगल युज प्लास्टिक टाळण्याची शपथ देण्याचा बोधिसत्व खंडेराव याचा मानस आहे.

हे सर्व ग्लास गरीब आणि गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

30 रुपये जमा करून या अभियानात सहभागी व्हावे आणि प्रदूषणमुक्त जीवनाची कास धरावी असे आवाहन करण्यात आले आहे.

बोधिसत्व खंडेराव याच्या नावाची ‘द यंगेस्ट एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिस्ट इन इंडिया’ म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 2013 सालापासून बोधिसत्व खंडेराव अनेक प्रकारचे पर्यावरण पूरक कार्यक्रम करत आहे. त्याने बिनखर्ची सामूहिक वनीकरणाच्या चार नवीन पद्धतींचा शोध लावला आहे आणि आजपर्यंत 500 ठिकाणी या पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवून प्रत्यक्ष अमलात आणले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने, 30/- रुपये पर्यावरण संरक्षण निधी जमा करून प्रत्येक सुजाण नागरिकाने आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन करण्यात आले आहे

9503112114

Copyright ©