प्रतिनिधी सावळी आशिफ शेख
घरफोडी करणारे चोरटे पारवा पोलिसांनी काही तासातच केले जेर बंद
पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर येथील ज्येष्ठ नागरिक महिला मीरा ज्ञानेश्वर शेंडे वय 60 वर्ष तिच्या घरावर पाळत ठेवून असलेले गावातीलच शिवा महादेव नेवारे व 26 वर्ष विठ्ठल प्रभाकर मरस्कोले वय 32 वर्ष या चोरट्यांनी रस्त्याच्या काठावर असलेल्या घराची घरफोडी करून 40 हजार रुपयांचा मुद्देमालासह चोरी केली याबाबत महिला फिर्यादी मीरा शेंडे यांनी पारवा पोलीस तक्रार दिली यावरून घटनेची गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार विनोद चव्हाण व स्थानिक गुन्हे शाखेने काही तासातच चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेर बंद केले या महिलेच्या दोन्ही मुलीचे लग्न झाल्याने बाहेर गावी गेल्यामुळे मिरा शिंदे ह्या महिला इंदिरानगर येथे एकट्याच वास्तव्यास होत्या याचाच फायदा घेत त्याच गावातील चोरटा शिवा नेवारे व विठ्ठल मोरे यांनी ही चोरी केल्याचे उघड झाले या चोरीमध्ये सोन्याची चैन अंदाजे किंमत वीस हजार रुपये रोख रक्कम दहा ते बारा हजार रुपये आणि सॅमसंग कंपनीचा टीव्ही किंमत 5000 रुपये व तीन हजार रुपये असा 39 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ही बाब मीराबाई यांना कळतात पारवा पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली होती या प्रकरणी ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड,पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास चक्र फिरवले असता घटनास्थळावर चोरट्यांचा रुमाल आढळून आला त्यावरून गोपनीय माहिती घेऊन या चोरांचा शोध घेण्यात आला याप्रकरणी चोरीस गेलेला मुद्दे माल हस्तगत करन्यात आला असून पुढील तपास प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले यापूर्वी सुद्धा सावरगाव येथील मंदिरातील चोरीचा छेडा काही तासातच लावण्यात पोलिसांना यश आले होते तोच या घटनेचा छळा काही तासातच लावून पुन्हा एकदा चोरट्यांच्या मुस्क्या आवडल्या ने चोरट्यांमध्ये चांगली दहशत निर्माण झाली आहे पारवा पोलीस स्टेशन हद्दीतील जनतेकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे याप्रकरणी विनोद चव्हाण बालाजी ससाने लखन राठोड सुरेश एक फुलवार संदीप महाजन राहुल उईके अमोल वाढली अनिल इंगोले प्रफुल पावशेर कर योगेश रंधे नरेश राऊत सुधीर पिदुळकर यांनी संयुक्त कारवाई पार पाडली
