प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार
संत मारोती महाराज परिसर अतिक्रमण मुक्त न प ची धडक कारवाई
घाटंजी शहरातील नागरिकांचे श्रद्धेचे स्थान असणारे संत मारोती महाराज मंदिराचे आजूबाजूच्या परिसरामधे संपूर्ण अतिक्रमण झालेले होते करिता नगर परिषद प्रशासनाने सकाळचे ११ चे सुमारास मंदिर परिसरातील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले व देवस्थान चा संपूर्ण परिसर मोकळा केला.तसेच जलाराम कृषी सेवा केंद्र यांचे रस्त्यावरील अतिक्रमण तोडण्यात आले. तसेच पत्रकार मंडळी यांनी आठवडी बाजार मध्ये नगर परिषद चे मुत्रिघर नसल्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती.नंतर नगर परिषद प्रशासनाने मुत्रिघर कुठे हरवले याचा शोध घेतला व शोध अंती असे दिसून आले की,आठवडी बाजारातील निलावार कृषी सेवा केंद्र यांनी नगर परिषदेचे मुत्रीघर तोडून अतिक्रमण केले होते. करिता निलावार कृषी सेवा केंद्र यांचे अतिक्रमण तोडण्यात आले. तसेच घाटी परिसरातील राजीव गांधी चौक मधील ४ ते ५ पानठेले व्यावसायिक यांचे सुद्धा नालीवरील अतिक्रमण तोडण्यात आले. तसेच घाटी परिसरातील श्री. पडलवार सर यांचे घरासमोरील कच्चा नालीवरील मुरूम उचलून अतिक्रमण हटविण्यात आले.करिता सदर भागातील अतिक्रमण मुक्त झाल्यामुळे शहरातील नागरिक आनंदित झालेले आहे. सदर ची अतिक्रमण मोहीम सकाळी ११ ते साय ०६ वाजेपर्यंत श्री. अमोल माळकर मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रॉजर नारणकर बांधकाम अभियंता, श्री. राजू घोडके पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता , श्री. प्रकाश घोती कार्यालय अधिक्षक , शंकर नेहारे , प्रवीण हातमोडे , बाळासाहेब भोयर , नितीन हातमोडे , अनिल पाईलवार , विशाल बिस्मोरे , स्वप्निल ढेकणे सर्व विभाग प्रमुख , सफाई कर्मचारी , कार्यालयीन कर्मचारी कंत्राटदार यांचे कर्मचारी यांनी अतिक्रमण मोहीम यशस्वी केली.तसेच नागरिकांनी नगर परिषद चे नाली व रस्त्यावर अतिक्रमण करू नये. शहरातील रस्त्यांना मोकळा श्वास घेऊ द्यावा असे भावनिक आव्हान या प्रसंगी मुख्याधिकारी श्री अमोल माळकर यांनी शहरातील नागरिकांना केलेले आहे.
