सेवाध्वज या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा
12 फेब्रुवारी 2023 ला बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे सेवाध्वज व संत सेवालाल महाराज यांचा अकरा फूट उंच अशा भव्य दिव्य अश्वरुढ पुतळ्याचे अनावरण आणि 593 कोटी रुपयांचा निधी असलेल्या विविध विकास कामांचा भूमी पूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व उप मुख्यमंत्री श्री .देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होणार आहे .न भूतो न भविष्यतम अशा होणाऱ्या या सोहळ्याला व या कार्यक्रमाचे आयोजक नामदार श्री.संजय भाऊ राठोड यांनी दिलेल्या हाकेला मान देऊन या कार्यक्रमाला समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने सहभागी होऊन ह्याची डोई ह्याची रुपी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन गायक तथा सिनेकलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण रा.माळेगांव यांनी केले आहे
