Home यवतमाळ न. प‌ शाळा क्रमांक 2 येथे 74 वा प्रजासत्ताक दिन व पतंग...

न. प‌ शाळा क्रमांक 2 येथे 74 वा प्रजासत्ताक दिन व पतंग महोत्सव संपन्न

13

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

न. प‌ शाळा क्रमांक 2 येथे 74 वा प्रजासत्ताक दिन व पतंग महोत्सव संपन्न

स्थानिक नगरपरिषद शाळा क्रमांक 2 घाटी येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन समारंभ, मुख्य ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री अरुण पडलवार सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. न्यामुमियॉं देशमुख उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय सैन्य दलातील सैनिक श्री. प्रमोद ककन , शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सविता प्रमोद कंकण, श्री. मोतीलाल चौरागडे, श्री. विनोद महाजन, श्री. शंकरराव गोडे, श्री. परवेज शेख उपस्थित होते.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे व देशभक्तीपर समूहगीत सादर केले. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः कागद व सुती धागा वापरून पतंग तयार केल्या. यावेळी मुख्याध्यापक श्री. अरुण पडलवार सर यांनी विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा व पॉलिथिनचा वापर करून बनवलेल्या पतंगामुळे होणाऱ्या दुष्परिणाबाबत मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित पतंग उडवून पतंग महोत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कु. वेणूताई मेश्राम, कु. वृषाली अवचित, सोनूताई पेटेवार, ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय गोलर, श्री‌.कृष्णा मडावी, श्री. वसंत सिडाम, श्री. तुषार बोबडे, श्री. नरेंद्र राठोड, अंगणवाडी सेविका व नारायण डहाके, कांचनताई मेश्राम यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©