Home यवतमाळ स्किझोफ्रेनिया आणि मानसिक स्वास्थ्य

स्किझोफ्रेनिया आणि मानसिक स्वास्थ्य

14

स्किझोफ्रेनिया आणि मानसिक स्वास्थ्य

स्किझोफ्रेनिया म्हणजे काय? याविषयी आपण थोडे जाणून घेऊया. बऱ्याच लोकांना या आजाराविषयी माहिती नाही.त्यामुळे मला असे वाटते याची जाणीव जागृती करणे अतिशय गरजेचे आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या आजाराविषयी थोडक्यात माहिती सांगितली जाते.म्हणजेच स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक आणि गंभीर असा आजार आहे.या आजारामध्ये व्यक्ती गोंधळलेले विचार,विविध भास आणि भ्रम या लक्षणांमध्ये जाणवतात. परंतु यावर लवकर आणि योग्य उपचार केल्यास रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो असे मला वाटते.

स्क्रीझोफ्रेनिया म्हणजे नेमके काय?

स्किझोफ्रेनिया रुग्णांना भ्रम होताना आढळून येते. त्याच्या मनामध्ये नेहमी भीती वाटते आणि नकारात्मक विचाराचे वादळ नेहमी सुरू असते.या रुग्णांमध्ये फार मोठ्या प्रमाणात नैराश्य असते आणि या नैराश्यातून ते पुढे आत्महत्या सुद्धा करू शकतात. कारण स्किजोफ्रेनिया रुग्णांच्या मनात अशा प्रकारचे विचार येणे ही सामान्य बाब आहे. जगातील लोकसंख्येच्या 1% टक्का लोक या आजाराने ग्रासलेली असून दीड कोटी लोक स्किझोफ्रेनियाची शिकार आहे.हा आजार 16 ते 45 या वयोगटांमध्ये होऊ शकतो.एका व्यक्तीला आजार झाल्यास त्याचा परिणाम कुटुंबावर, मित्रावर आणि त्याच्या आजूबाजूच्या समाजावर देखील होतो.

या आजाराची काही लक्षणे आहेत-

नकारात्मक लक्षण – यामध्ये व्यक्ती स्वतःपासून फार दूर निघून जातो व व्यक्ती मानसिक दृष्ट्या हताश आणि कमजोर होतो.

आकलनात्मक लक्षण – व्यक्ती कोणत्याही एका गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही.

भावनात्मक लक्षण – या या रुग्णाला सुद्धा सुखदुःख अशा कोणत्याच भावनेची जाणीव होत नाही.या प्रकारे मृत व्यक्ती सारखी या रुग्णांची अवस्था होते.

तज्ञांच्या मतानुसार मेंदूमध्ये एक न्यूरो ट्रान्समीटर आढळते.त्याला डोपामाईन असे म्हटले जातात. या टोपामाईन मध्ये जर असंतुलन झाले तर स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. जगामध्ये कोणत्याही आजारावर औषध असतेच. रुग्णांची इच्छाशक्ती आणि योग्य इलाज या दोन बाबी असल्यास हा आजार बरा होऊ शकतो. यासाठी योग्य समुपदेशन सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. आपलं शरीर जसं विविध अंगांनी नटले जातं. तसंच त्यांच्या आतील भागात ही वेगवेगळ्या संस्था काम करतात.आपण श्वास घेतो,ती श्वसन संस्था. आपण अन्न खाऊन ते पचतं ही पचन संस्था.या सर्व विभागात खूप साचेबद्ध काम चालतं ‘मन’ ही देखील आपल्या शरीराची मेंदूची एक संस्था .पण निराळी! काही सरळ तर काही क्लस्टि ठोकताळे असतात. औषधोपचार हा त्या आजाराचा प्रमुख उपाय होय.गोळ्यांनी मेंदूतील डोपामाईन नॉर्मल होण्यास मदत मिळते.कधी कधी या गोळ्यांनी झोप येने,थरथरणे अशी कारणे दिसू शकतात. काही रुग्णांना इसिटी ही उपचार पद्धती करावी लागते. जे रुग्ण स्वतःला किंवा इतरांना इजा पोचवतात त्यांच्यासाठी ही उपचार पद्धती वरदान ठरते.अशा रुग्णांचा सांभाळ करीत असताना घरातील सदस्यांनी स्वतःला खूप शांत ठेवणे गरजेचे असते.अशा पेशंटचा सांभाळ करायला घरातील वातावरण खूप आनंदाचे ठेवणे गरजेचे असते. त्याचबरोबर स्किझोफ्रेनिया आजाराचा रुग्ण बरा होण्याकरिता पैशाची खूप आवश्यकता असते त्याची व्यवस्था घरातील व्यक्तींनी करून ठेवणे गरजेचे असते. रुग्णांना सांभाळणाऱ्या व्यक्तीमध्ये खूप पेशन्स असायला हवे आणि मोठ्या प्रमाणात सामांजसपणा असल्यास स्किजोफ्रेनिया रुग्णाचे मानसिक आरोग्य ठीक होण्यास मदत होईल. असे माझे वैयक्तिक मत आहे.

प्रा.डॉ.मनीषादेविदासक्षीरसागर

Copyright ©