Home यवतमाळ महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची आढावा बैठक संपन्न

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची आढावा बैठक संपन्न

13

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची आढावा बैठक संपन्न

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची आढावा बैठक
नुकतीच वडगाव येथे घेण्यात आली
या बैठकीस महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अशोक जी भाले यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले सर्व प्रथम गवळी समाज संघटनेचे नेते माजी खासदार हंसराजभैया अहिर यांच्या बंधूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या
बैठकीला माजी जिल्हा सचिव संतोष भाऊ डोईजड यांनी समाजाची जनगणना गावोगावी जाऊन करण्यात यावी अशी सुचना आपले भाषणातून केली.
जिल्हा प्रसिद्ध प्रमुख ओकार चेके यांनी सुध्दा जनगणना व तालुका कार्यकारिणी जाहीर करताना शहरी व ग्रामीण अशा प्रकारे करावी अशी सूचना दिल्या,जिल्हाध्यक्ष नारायणभाऊ पुलाते यांनी समाजाची तालुका कार्यकारिणी व सदस्य नोंदणी लवकरच संपूर्ण तालुक्यात करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली, यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष अनिल भाऊ चावरे यांनी सुध्दा संपूर्ण यवतमाळ जिल्हाचा दौरा करून गावपातळीवर कार्यकारिणी लवकरच घोषित करण्यात येईल अशी माहिती दिली अध्यक्षीय भाषणात अशोकजी भाले यांनी समाज संघटना चालविताना काय अडचणी येतात व त्यावर त्यांनी कश्या प्रकारे मात केली तसेच सदस्य नोंदणी व तालुका कार्यकारिणी लवकरच पूर्ण जिल्ह्यात जाहीर करावी अश्या सुचना देण्यात आली.
या बैठकीला यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष अनिल भाऊ चावरे, जिल्हा सदस्य शंकर भाऊ माटे, गजानन झाडे, कीशोरभाऊ डोईजड, बबनराव चौधरी, गजानन डोईजड, कीशोरभाऊ कटेकर,ऐकोतखाणे,विवेक ऊन्हाळे, व समाजातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या मासिक बैठकीचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन यवतमाळ जिल्हा सचिव दिपक राम लंगोटे यांनी केले

Copyright ©