Home यवतमाळ चिखलवर्धा सरपंच कु.वर्षा भीमराव कनाके यांनी हेतूपुरस्पर उपसरपंचावर जातीवाधक खोटी तक्रार दाखल

चिखलवर्धा सरपंच कु.वर्षा भीमराव कनाके यांनी हेतूपुरस्पर उपसरपंचावर जातीवाधक खोटी तक्रार दाखल

13

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

चिखलवर्धा सरपंच कु.वर्षा भीमराव कनाके यांनी हेतूपुरस्पर उपसरपंचावर जातीवाधक खोटी तक्रार दाखल

घाटंजी न्यायालयाने समन्स जारी कु.वर्षा भीमराव कनाके ला

घाटंजी – तालुक्यातील बहुचर्चित असलेली चिखलवर्धा ग्राम पंचायत येथिल सरपंचा कु.वर्षा भीमराव कनाके यांनी हेतूपुरस्पर उपसरपंचावर जातीवाधक शिवीगाळीची तक्रार दाखल केली होती. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले.यात सर्व बाजूने पडताळणी झाल्यानंतर ही तक्रारच खोटी असल्याचे पुढे आले असून सरपंच यांचेवर २११व ५००अन्तर्गत समन्स पारित केले आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले उपसरपंच तथा फिर्यादी यांनी सरपंच निवडीत कु.वर्षा भीमराव कनाके यांना सहकार्य करून सरपंच बनविले.मात्र काही दिवसानंतर इतरांचे ऐकून सरपंच यांनी उपसरपंच आकाश नडपेलवार यांचेवर पारवा पोलीस स्टेशनला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली.मात्र आपण नमूद वेळी गावातच नसल्याने शिवीगाळ करणार कसे असे उपसरपंच यांनी सांगितले त्यावरून पोलीस तपासात डोरली ,घाटंजी मोबाईल लोकेशन दिसून आले.या प्राप्त अहवालावरून पोलिसांनी ब समरी न्यायालयात दाखल केली यावरून सरपंच यांना यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालय येथे धाव घेतली मात्र तेथेही हाच निर्णय कायम राहिला.यावरून आपल्यावर खोटी तक्रार झाली आपली मानहानी झाल्यावरून उपसरपंच तथा फिर्यादी आकाश नडपेलवार यांनी घाटंजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांचे कडे दाद मागितली त्यावरून सरपंच कु.वर्षा भीमराव कनाके यांनी खोटी तक्रार केल्याचा ठपका ठेवत कलम २११ व ५०० अन्वये समन्स जारी करण्यात आले आहे.सदर प्रकरणात फिर्यादी आकाश नडपेलवार यांचे कडून ऍड.नेताजी राऊत व ऍड.सादिक खान यांनी युक्ती वाद केला त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून हा निकाल लागले असल्याचे उपसरपंच तथा फिर्यादी आकाश नडपेलवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.

Copyright ©