Home यवतमाळ मुंबईच्या महामोर्चात विदर्भातुन हजारो लिंगायत बांधव सहभागी होणार

मुंबईच्या महामोर्चात विदर्भातुन हजारो लिंगायत बांधव सहभागी होणार

10

मुंबईच्या महामोर्चात विदर्भातुन हजारो लिंगायत बांधव सहभागी होणार

मुंबईत होणाऱ्या महामोर्चात सहभागी होणाऱ्या लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात लिंगायत समन्वय समिती व सकल लिंगायत समाजाच्या वतीने दि. २९ जानेवारी रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात विदर्भातुन हजारो लिंगायत बांधव सहभागी होणार असल्याची माहिती डॉ.अशोक मेनकुदळे यांनी दिली.

लिंगायत समाजास संवैधानिक मान्यता देऊन अल्पसंख्याक दर्जा द्यावा, लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे भव्य स्मारक उभारावे या मागणीसाठी दि. २९ जानेवारी रोजी मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लिंगायत समन्वय समिती व सकल लिंगायत समाजाच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या महामोर्चात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील ५ लाखांच्यावर समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अॅड. अविनाश भोसीकर यांनी दिली..

समाजहितासाठी निघणाऱ्या भव्य मोर्चात यवतमाळ नागपुर,अमरावती,चंद्रपुर,वर्धा गडचिरोली,अकोलासह विदर्भातुन हजारो समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती यवतमाळचे डॉ.अशोक मेनकुदळे,ह्यांनी दिली आहे हा मोर्चा यशस्वी करण्याकरिता डॉ.जयेश हातगांवकर, डॉ.किशोर मांडगावकर, निलेश शेटे, गिरीश गाढवे, डॉ.मनोज टेवरे,अजय खारपाटे, राजु कुऱ्हेकार, कैलास वाघमारे,सचिन शेटे,निर्मल ठोंबरे,संजय तोडकरी,महेन्द्र ठोंबरे,सुरेश शेटे,बाळासाहेब दिवे,ईत्यादी समाज बांधव प्रयत्न करित आहे.

Copyright ©