बोदेगावातील अंतर्गत रस्ता ठरत आहे जीव घेणा,
ग्रामपंचायती चे मात्र दुर्लक्ष
बोदेगाव येथील अंतर्गत रस्ता दुरुस्त करण्याचे काम मागील दोन महिन्या पासून बंद असल्याने येथील ग्रामस्थांना व विद्यार्थ्याना त्रास दायक ठरत आहे आहे या रस्त्यावरील कधी अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी ये जा करीत असतात,या रस्त्यावरून मोठ्या वेक्तीनाच तर चालणे कठीण आहे तर विद्यार्थ्यांचे काय हाल होत असेल या करून लक्षात येते, ग्रामस्थांनी हि बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली मात्र याची दखल अजूनही घेतली नसल्याने सर्व सामान्यांन मध्ये रोष वेक्तं होत आहे.येथील ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.या रस्त्या मुळे होणाऱ्या दुर्घटनेत ग्रामपंचायत जबादार राहणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
