अल्पावधीतच भंगारवाले कोट्याधीश कसे ?
कितीही दर्जेदार चोरीतील साहित्य भंगारात होते गडप
दिग्रस शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी भुरट्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे सर्वश्रुत असताना शहरासह तालुक्यातील शेतकरी असो किंवा नोकरदार वर्ग असो त्यांच्या मोटर सायकल चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला ही बाब एवढ्यावरच ना थांबता शासकीय कार्यालयाच्या प्रांगणातून सुद्धा अधिकाऱ्यांच्या दिवसाढवळ्या मोटरसायकली चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी दिग्रस पोलीस पोलिसात आहे आणि शेतकरी आपल्या शेतामध्ये राबवून आपल्या पिकाचे संगोपन करतो आणि आपल्या शेतातील पिकाला पावसाळ्याच्या शेवट शेवट कपाशी सारख्या पिकाला पावसाची आवश्यकता असते मात्र त्यावेळी ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे तो शेतकरी आपल्या शेतातील विहिरीवर मोटार पंपाने पाणी देऊन आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करतो मात्र त्यांच्यावर अनेक नैसर्गिक संकट ओढवल्या जाते त्यात कृत्रिम संकट म्हणजे त्याचे शेतातील शेती पंप तसेच कोण्या शेतकऱ्यांच्या केबल चोरीच्या अनेक तक्रारी पोलिसात असताना ह्या सर्व साहित्य भंगारात मोठ्या प्रमाणात गडप होत असल्याचे अनेक प्रकरणात सर्वांना ज्ञात असताना कार्यवाही ऐवजी संबंधित विभागाकडून डोळेझाक तर होत नाही ना ? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहे अल्पावधीतच भंगारवाले कोट्याधीश कसे ? हा प्रश्न शेतकऱ्यांनकडून उपस्थितीत केला जात आहे
