तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई चा निधी प्राप्त
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार
घाटंजी-तालुक्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना पाहिजे तशी नुकसान भरपाई मिळाली नाही. या अन्यायाविरोधात “लढाई बळीराजाच्या हक्कासाठी” या आंदोलनां अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे व जि प सदस्य आशिष लोणकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला प्रथम निवेदन व नंतर दिनांक 10 नोव्हेंबर 2022 ला दोन दिवस आमरण उपोषण केले होते. या आमरण उपोषणांमध्ये तालुक्यातील अभिषेक ठाकरे, आशिष लोणकर, सुरेश नाईक, मधुकर डंभारे, गुणवंत लेन्गुरे ,देवराव वाडगुरे, वसंता जाधव आमरण उपोषणास बसले होते. आमरण उपोषणाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता तहसील प्रशासनाने उपोषण कर्त्यांच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जादा नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले . आणि शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी केली होती. परंतु त्यांनी दिलेला कालावधी संपूर्णही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही म्हणून शेतकरी नेते श्री अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांनी दि २८ डिसेंबर २०२२ ला तहसीलदार घाटंजी यांना स्मरणपत्र देऊन आश्वासनाबाबत विचारणा केली .तेव्हा दिनांक 1 डिसेंबर 2022 ला तहसीलदार घाटंजी यांनी उपोषणकर्त्यांशी पत्रव्यवहार करून शासनाकडून नुकसान भरपाई साठी निधी प्राप्त झाला असून असून ग्रामसेवक ,तलाठी यांच्याकडून याद्या प्राप्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, त्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल असे कळविले. शासनाकडून अतिरिक्त निधी प्राप्त झाल्यामुळे येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळणार हे आता जवळपास निश्चित झाली आहे. शेतकऱ्याच्या संघटित आंदोलनाचे हे यश असल्याचे मनोगत अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले अभिषेक ठाकरे व
आशिष लोणकर यांनी केलेल्या आमरण उपोषणाला यश केवळ आंदोलनाकरता आंदोलन असे न राहता शंभर टक्के फलश्रुती मिळविणाऱ्या या आमरण उपोषणाची शासन स्तरावर एवढ्या तत्परतेने पहिल्यांदाच दखल घेतल्या गेल्याचे चित्र दिसत आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.
