जागतिक वकील दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन
जागतिक वकील दिनाचे औचित्य साधून जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ येथे जिल्हा वकील संघ यवतमाळ व आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित शौर्य ब्लड सेंटर, ब्लड कंपोनंट अफेरेसीस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय एस.व्ही. हांडे साहेब,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यवतमाळ यांचे हस्ते पार पडले. या शिबिरास माननीय सुभाष रं.काफरे साहेब,न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय यवतमाळ, डॉ. गौरी कवडीकर मॅडम जिल्हा व सत्र न्यायाधीश1, माननीय अमित लऊळकर साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश 2 व सर्व माननीय न्यायाधीश उपस्थित होते. या प्रसंगी न्यायाधीशांकडून वकील संघाच्या सर्व सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. ज्येष्ठ विधीज्ञ मंडळींचा सन्मान करण्यात आला. जागतिक वकील दिनी दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अमित बदनोरे यांनी बोलून दाखविला. सदर शिबिरा करिता जिल्हा संघाचे सचिव ॲड.आशिष तोटे,ॲड. संदीप गुजरकर, ॲड.अजय डाखोरे, वकील संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य ॲड. सुमित कांबळे, ॲड.मनोज इंगोले, ॲड. युवराज धांदे तसेच मा.अधिवक्ता ॲड.अशोक गुप्ता, ॲड.प्रशांत किर्दक,ॲड.प्रवीण धुळधुळे, ॲड.नवीन रॉय, ॲड. जयसिंग चव्हाण, ॲड.इम्रान देशमुख, ॲड.मिनाजउद्दीन मलनस, ॲड. विपिन ठाकरे,ॲड.आकाश मंगतानी, ॲड.निलेश धांदे, ॲड.सचिन बोबडे,ॲड.मनिषा धांदे,ॲड. सविता मद्दीवार मॅडम,ॲड. अमोल शहाकार,ॲड.दिनेश खुरद, ॲड. हेमंत मानेकर, ॲड.किरण चौधरी मॅडम,ॲड.सवीन तायडे, रहीम भाई, सुधीर बुटले, विनायक निखाडे तसेच वकील, वकिलांचे कारकून, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस शिपाई इत्यादींनी सक्रिय सहभाग घेतला. रक्तदान शिबिराचे यशस्वीते करिता शौर्य रक्तपेढी यवतमाळ तर्फे निषा बिसेन, शिवशंकर भताने, हर्षिता चौरीवार, काजल बिसेन यांचे रक्तसंकलन कार्यात मोलाचे योगदान लाभले.
