Home यवतमाळ विरपत्नी वाढदिवसाचा खर्च आत्महत्या ग्रस्त कुंटूबाच्या परिवाराला

विरपत्नी वाढदिवसाचा खर्च आत्महत्या ग्रस्त कुंटूबाच्या परिवाराला

12

विरपत्नी वाढदिवसाचा खर्च आत्महत्या ग्रस्त कुंटूबाच्या परिवाराला

सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा लगत असलेल्या व सदैव सामाजिक वारसा जपणार्या आदर्शगाव कृष्णनगर,या गावातील शहीद परिवाराने आपला वाढदिवस साजरा न करता,आपल्या वाढदिवसावर होणारा अपव्य खर्च टाळुन परिसरातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत केली,अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा मोठा इव्हेंट झालेला आहे,राजकीय नेत्याकडून वाढदिवसानिमित्ताने शक्ती प्रदर्शन केले जाते,आणि वाढदिवसासाठी मोठा खर्च केला जातो,मात्र या शहीद परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा खर्च टाळून,सावळी सदोबा परिसरातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना माळेगांव-श्रीमती विना प्रेम पवार-पुरुषोत्तमनगर-श्रीमती रेश्मा दिलीपराठोड,साखरतांडा-श्रीमती सविता उकंडा चव्हाण,कृष्णनगर-श्रीमती रेणुका कृष्णा राठोड,तथा विद्युत शॉकमुळे मृत्यू पावलेल्या उमरी कोपेश्वर येथील स्व .प्रमोद नेवारे व स्व.जिवन काळे यांच्या परीवाराला शहीदपत्नी कुन्तीताई आडे यांच्याकडून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब यांच्या परिवारातील सदस्यांना साडी,चोळी,कपडे वआर्थिक मदत म्हणून प्रत्येकी रोख ५००० रू. देण्यात आले,काही महिन्या अगोदर त्यांच्या मुलाचा पण वाढदिवस त्यांनी अशाच प्रकारे परिसरातील माळेगांव येथील बादल कुमार चव्हाण व भारत कुमार चव्हाण या दोन्ही अनाथ भावन्डाना दत्तक घेत,त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारून अनाथ मुलाच्या घरी जाऊन वाढदिवस साजरा केला व आर्थिक मदत देऊन ,गोरगरीब जनतेविषयी असलेली शहीद कुटुंबीयांची आत्मीयता खरोखरच अतुलनीय आहे

Copyright ©