Home यवतमाळ *भाऊबिज पारधी बेड्यावर*

*भाऊबिज पारधी बेड्यावर*

11

भाऊबिज पारधी बेड्यावर

आज दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी जनसेवा फाऊंडेशन तर्फे दिवाळी भाऊबीज कार्यक्रम वाघाडी पारधी बेडा येथे घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा आध्यात्मिक मंच अध्यक्ष मा. अजयजी मुंदडाजी व प्रमुख पाहुणे म्हणून मा. राजूभाऊ निवलजी विश्व हिंदू परिषद प्रांत अध्यक्ष पार्वती ऑटो मोबाईल व्यवस्थापक, संस्थेचे मार्गदर्शक गूळमे हजर होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता केळापुरे , संतोषजी भोयर, व तसेच संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र ढोबळे दाभाडकर भाऊ सचिव डॉ. भूषणकुमार ढोबळे,. अभयजी जोशी, सौ. सिता ढोबळे या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन हा भाऊबीजचा उपक्रम घेत महिलांना साडी चोळी व फराळ वाटप करून सर्वांनी हा आनंद घेतला या बरोबरच आपणास आवाहन करण्यात येते की आपण सुद्धा आपल्या परीने असे आपल्या गावं पातळी वर कार्य करू शकता. जनसेवा फाऊंडेशन प्रसिध्दी प्रमुख नम्र. डॉ. मिनाक्षी ढोबळे यांनी केले.

Copyright ©