किशोर बिहाडे, महागावं (कसबा) प्रतिनिधी
आमचे गाव आमचा विकास कार्य शाळा महागाव(कसबा)त संपन्न
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२३/२०२४अन्तर्गत् जि प यवतमाळ व प स दारव्हा कडून “आमचे गाव आमचा विकास ” कृती आराखडा तयार करण्यासाठी प स महागावं कसबा गण, सायखेडा गण व डोल्हारी गणातील ३२गावाचि कार्यशाळा दी,४/११/२०२२ला कमलेश्वर मंदिर महागांव कसबा च्या सभागृहात संपन्न झाली या प्रसंगी गटविकास अधिकारी राजीव शिंदे दारव्हा ,विस्तार अधिकारी आर, ऐस, फुटाणे , पंचायत आर बी अग्रहारी,पंचायत व्ही .डी. उपलेंचवार कृषी विस्तार अधिकारी,कु.मसराम मॅडम सहा . आरोग्य विस्तार अधिकारी हे उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उदघाटन महागांव कसबा चे सरपंच श्री किशोर बिहाडे करण्यात आले.यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार घालून कार्यशाळेचे उदघाटन किशोर बिहाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ३ गणातिल ३२ गावातील सरपंच ,उपसरपंच, सचिव, ग्रा ,प सदस्य सर्व गावचे पटवारी तंटा मुक्ती अध्यक्ष, आशा वर्कर , अगणवाडी सेविका , महिला बचत गट , कृषि सखी, पशु आरोग्य सेवक कृषि सहयायक , मुख्याध्यपाक मोठया प्रमाणात उपस्थित होते या वेळी २०२३/२०२४ कृती आराखडा तयार करताना गावचा सर्वांगीण विकास व्हावा या साठी १५वा वित्त आयोगाचा निधी आणी ग्रामपंचायतचे १३वित्त् आयोग् १४वित्त् आयोग ग्रामपंचायतचा सर्व्हच् निधी कर जमा करुन गरजाचे प्राधानक्रम लावून निधीचा वापर कसा करावा या बाबत मार्गदर्शन करण्यात आले आमचे गाव आमचा विकास कसा होईल ते सांगण्यात आले
या कार्यशाळेत गरिबीमुक्त गाव या साठी उपजिविका वृद्धी,आरोग्यदाई गाव, बाळस्नेही गाव , जल समुद्ध गाव ,स्वच्छ हरित गाव, स्यवपूर्ण गाव, समाजिक न्याय सुशासन युक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव, या ९/सूत्रीवर भर देण्यात आले अनेक चांगल्या ग्रामपंचायत ला पुरस्कार कसे मिळवावे हेही सांगण्यात आले या प्रसंगी चहापाणी आणी सर्वान साठी जेवणानाची उत्तम व्यवस्था केली होती या वेळी सर्वांना पेन माहिती पुस्तिका नोंदवही देण्यात आली..
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महागांव कसबा ग्रामपंचायत चे सचिव आर.ए.जाधव, कर्मचारी संतोष चव्हाण, अजय चव्हाण, अशोक भगत यांनी विशेष परिश्रम घेतले.
