Home Breaking News चाळीस वर्षानंतर दिघोरी गावाला मिळाली हक्काची ग्रामपंचायत

चाळीस वर्षानंतर दिघोरी गावाला मिळाली हक्काची ग्रामपंचायत

11

चाळीस वर्षानंतर दिघोरी गावाला मिळाली हक्काची ग्रामपंचायत

आतापर्यत नव्हता गावातील नागरिकांना मतदानाचा अधिकार

यवतमाळ व दारव्हा तालुक्याच्या सीमेवर असलेले दिघोरी, वरुड गाव चाळीस वर्षापासून गावात ग्रामपंचायत नसल्याने विकासापासून कोसो दूर होते. गावाला हक्काची ग्रामपंचायत मिळावी यासाठी गावातील पुरुषोत्तम राठोड तसेच नागरिकांनी आठ वर्षांपासून अतोनात प्रयत्न केले. विविध अडथळ्याचा सामना करावा लागला. परंतु राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने चाळीस वर्षानंतर गावाला हक्काची ग्रामपंचायत मिळाली.

यवतमाळ जिल्ह्यात स्वतंत्र काळानंतर मोझर, इजारा, वरुड, दिघोरी अशी तीन गाव मिळून ग्रामपंचायत तयार करण्यात आली होती. गावातील नागरिक मतदानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर सदस्य निवडणूक देत होती. परंतु सन १९८२-८३ मध्ये शासनामार्फत जिल्ह्यातील तालुक्याची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये मोझर हे गाव दारव्हा तालुक्यात आले. व दिघोरी, वरुड इजारा यवतमाळ तालुक्यात आले. त्यामुळे मूळ ग्रामपंचायत मोझर दारव्हा तालुक्यात आल्याने दिघोरी व वरुड इजारा या गावाला ग्रामपंचायत मधून काढण्यात आले. त्यामुळे १९८३ पासून दिघोरी व वरुड इजारा हे गाव शासनाच्या योजनेपासून वंचीत राहत आहे. गावात कोणतेही विकासात्मक कामे नसल्याने गाव विकासापासून दूर आहे. २०११ च्या जनगणनेवरून दिघोरी या गावाची लोकसंख्या ८०१ तर वरुड इजारा या गावाची लोकसंख्या ४८५ आहे. त्यामुळे शासन एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. व या गावातील नागरिकांनी ४० वर्षापासून गावात ग्रामपंचायत नसल्याने निवडणुकीचा हक्क बजावला नाही. अशात गावातील पुरुषोत्तम राठोड व गावातील नागरिकांनी गावात ग्रामपंचायत व्हावी व गावाचा विकास व्हावा याकरिता आठ वर्षांपासून प्रयत्न केले. मंत्रालयात चकरा मारल्या. अनेक अडथळे येत होते. त्यानंतर पालकमंत्री संजय राठोड आणि गावातील पुरुषोत्तम राठोड यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भेटून दिघोरी, वरुड इजारा या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर केली. त्यानंतर जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आदेशावरून गावात लवकरच ग्रामपंचायत निर्माण होणार आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालकमंत्री संजय राठोड यांचा गावकऱ्याकडून सत्कार

शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दिघोरी (ता.जि.यवतमाळ) येथे श्री बळीराम महाराज यांच्या अमृतवाणीतून सुरू असलेल्या श्री सेवालाल बापू चरित्र वाचन उत्साह सोहळ्याला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले.
दिघोरी व वरुड(ईजारा) ला ग्रामपंचायत चा दर्जा मिळवून दिल्या बद्दल मा. पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचे सत्कार घेतले. दिघोरी गावातील ग्रामस्थांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असून सात दिवस चालणाऱ्या या उत्साहाची समाप्ती श्री संत कनिराम बापू यांच्या हस्ते होणार आहे.

Copyright ©