ध्यानामधील नवीन प्रणाली म्हणजेच मैत्रिध्यान व 6R
जेतवन पर्यटन स्थळ येथे दिनांक २७/१०/२०२२ रोजी धम्मसुखा हॉल चे उद्घाटन कॅनडा येथील भंते आनंद यांनी केले.त्या प्रसंगी भारतातील व परदेशातील साधकांना भंते आनंद यांनी उपदेश देताना म्हंटले की.ध्यानाचा शोध तथागत बुद्धांनी २५०० वर्षापूर्वी लावला व त्या काळी ज्या प्रकारचे मनाने त्रस्त मानव भगवान बुद्धांकडे जात.त्यांच्या मनाचे विकार बघून तथागत बुद्ध त्या त्या प्रकारच्या मनुष्याला ध्यानाच्या प्रणाली देत.त्या ध्यानामधील एक प्रणाली म्हणजेच मैत्री ध्यान.मैत्री ध्यानाचे त्यांनी विविध प्रकार सांगितले स्वताला सुखी आनंददित करण्यासाठी आधी स्वतः ला मंगल मैत्री देणे या नंतर पृथ्वी तलावावरील सर्व प्राणी मात्राला मैत्री देणे त्यांचे मंगल हो,त्यांचे कल्याण हो,त्यांना दुःखातून मुक्ती मिळो या प्रमाणे मनातून त्यांना मंगल मैत्री पाठवणे.दुःखाचे मूळ कारण म्हणजेच तृष्णा.तुष्णा स्वतःची असो की दुसऱ्यांची ती जो पर्यंत जाणार नाही तो पर्यंत माणूस दुःखातून मुक्त होणार नाही.
चार आर्यसत्य या आधारावर ध्यानी साधकांनी मैत्री भावनेचा अभ्यास केल्यानंतर मनाला व शरीराला शांत करण्यासाठी 6R अत्यंत आवश्यक आहे.म्हणजेच 1लाR Recognise म्हणजेच मनाला त्रास देणारे विचार ओळखणे, 2राR Release म्हणजेच विचारांना मुक्त करणे,3राR Relax म्हणजे मनावर आलेला ताण मुक्त करणे,4थाR म्हणजे Resmile म्हणजेच चेहऱ्यावरचं हास्य ठेवणे,5वाR Return वर्तमानात येणे,
6वाR repeat म्हणजेच पुन्हा हे 6R चे चक्र आमलात आणणे. पाश्चिमात्य देशात धर्माची आवश्यकता नसते परंतु श्रीलंका व भारत देशामध्ये सर्वात जास्त बुध्द धम्माला माननारा वर्ग आहेत.आपण रोजच्या जिवनामध्ये ज्या दैनेंदिन गरजा भागविण्यासाठी ज्या भौतिक गरजा आहे त्या गरजा माणसाला नेहमी दुःखी करतात.परंतु या दुःखा मधून जर मानवाला मुक्त व्हायचे असेल तर मैत्रिध्यान व 6R हे गरजेचे आहे.पूज्य भंते यांनी मज्जिमनिकाय, त्रिपिटक इत्यादी ग्रंथाचे संदर्भ देऊन साधकांना सविस्तर मार्गदर्शन केले. शिबिराचे आयोजक आयु.रमेश बनसोड यांनी पूज्य भंते आनंदा यांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकामध्ये देशातील व परदेशातील साधकांना मनुष्य मानव दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर ध्यान मार्गाचा अवलंब करावे. आपल्यातील असलेले विकार दूर करावे व सर्वांनी निर्व्यसनी जीवन जगावे असे या वेळी उदगार काढले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिल बनसोड, जयश कांबळे,गौतम बनसोड,सायली बनसोड,सुमेध बनसोड,यश बनसोड,रुपेश बनसोड,निखिल मानकर,किशोर खिरडकर,प्रतिका बनसोड,पंडित वाघ,संजय हुलगुंडे इत्यादींनी परिश्रम घेतले.
