राज्य व राष्ट्रीय सब ज्युनिअर कराटे चॅम्पियनशिप करीता 22 ऑक्टोंबर ला निवड चाचणी कराटे स्पर्धाचे आयोजन
कराटे डो असोसिएशन यवतमाळ या संघटनेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, गोधनी रोड यवतमाळ मध्ये दि. 22 ऑक्टोंबर 2022 शनीवार सकाळी 10 वाजता ला यवतमाळ जिल्हा सब-ज्युनियर कराटे निवड चाचणी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. सदर निवड चाचणी ही कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दि. 5 व 6 नोव्हेंबर 2022 रोजी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, औरंगाबादच्या येथे करण्यात आले त्याकरिता घेण्यात येत आहे अशी माहिती संघटनेचे महासचिव सिहान संदीप गाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यानंतर सदर राज्य स्पर्धेतील विजेते खेळाडू हे 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार्या अखिल भारतीय सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद 2022 स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. तत्पूर्वी जिल्हयातील सब ज्युनिअर खेळाडुंची निवड चाचणी घेऊन विजेत्या स्पर्धकांना होणाऱ्या राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्य संघटनेकडे कागदोपत्री पूर्तता करायची असल्यामुळे यवतमाळ जिल्हयातील प्रशिक्षकांनी आपल्या खेळाडूंना या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन यामाध्यमातून केले आहे. ही स्पर्धा कॉमन वेल्थ कराटे फेडरेशन (CKF), साऊथ एशियन कराटे फेडरेशन ( SAKF), वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF) व इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी (IOC) यांच्याशी संलग्न असलेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन (KIO) मान्यतेने संपन्न होणार आहे. तरी या जिल्हा स्तरीय सब ज्युनिअर कराटे स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी www.karatemaharashtra.in याठिकाणी संकेतस्थळावर वा आमचे कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (KAM) चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सेन्साई रोहित केवारकर(मो.न.9689024189) यांच्याशी वा राज्य महासचिव संदीप गाडे (मो.न.9892152197) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
