Home यवतमाळ माजी राष्ट्रपती यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप

माजी राष्ट्रपती यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप

12

माजी राष्ट्रपती यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप

ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र, भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव आणि आर. एन. न्युज चॅनल, बाभुळगाव यांचे संयुक्त विद्यमाने भारतरत्न, देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनी (15 ऑक्टोंबर 1931 ते 27 जुलै 2015) “राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिवस” व “आर. एन. न्युज चॅनल, बाभुळगावच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्य” वाचन संस्कृतीस प्रोत्साहन देण्याहेतू वाचकांना “ग्रंथ-भेट” कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. 15 ऑक्टोंबर 2022 रोजी बाभूळगाव बस स्थानकावर करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा काळमेघ यांनी भूषविले. तर आर. न्युज. चॅनल चे संचालक मा. नईमभाई, मा. अभयभाऊ गुगलिया अध्यक्ष ग्रामविकास सोसायटी बाभूळगाव, मा. गौतम लांडगे माजी सभापती पंचायत समिती बाभुळगाव, मा. राजुभाऊ पांडे माजी संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव, मा. संजुभाऊ मारकंड प्रतिष्ठीत ग्रामस्थ, मा. प्रफुल परडखे पत्रकार, मा. रविभाऊ ढोणे, मा. गजाननराव वासे प्रतिष्ठीत नागरिक, अमोलभाऊ मारकंड संचालक बालाजी न्युज एजन्सीज, मा. मनमोहन भोयर सामजिक कार्यकर्ते, प्रल्हाद्रराव मारकंड प्रतिष्ठीत नागरिक, प्रा. डॉ. दिलीप खूपसे, प्रा. डॉ. वामन विरखेडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत ‘ग्रंथ-भेट’ देऊन करण्यात आले. प्रसंगी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे छोटेखानी जीवन-चरित्र, कथा, कादंबरी, कविता संग्रह, दैनंदिन सुविचार, अवांतर ग्रंथ, वैचारिक ग्रंथ, सामाजिक समस्यांशी निगडित पुस्तके ह्या व इतरही प्रकारची एकूण 200 ग्रंथ ‘प्रत्येकी एक पुस्तक सस्नेह वैचारिक भेट’ म्हणुन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली. बाबाजी दाते महाविद्यालय यवतमाळचे माजी प्राचार्य डॉ. रा. गो. चवरे यांनी लिखित ग्रंथ त्यांनी ह्या उपक्रमास मोफत उपलब्ध करुन दिलीत. उपस्थित मान्यवरांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन, कार्यावर आपल्या संबोधनातून प्रकाश टाकला. व वाचानासंबंधी जनजागृती केली. वाचनाचे महत्व, आवश्यकता व फायदे आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे संयोजक तथा महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. संजय शेणमारे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे प्रमुख प्रा. डॉ. निलेश सुलभेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता ग्रंथालय सहाय्यक गजानराव पाचकवडे आणि मधुकर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिकांची मोठया संख्येने गर्दी उसळली होती. राजू पाटील, कृष्णा रंगारी, किसनराव टेकाम, निलेश तुरके, अमोल गोविंदवार, प्रशांत टेकाम, ज्ञानेश्वर उबाळे, प्रमोद कांबळे, सुनिल गुप्ता, संजय मुसळे मांगूळ, आतिक शेख राणी अमरावती, सय्यद अली बाभूळगाव, सुनिल माहुरे बाभूळगाव, संदीप बोंदडे मेंढला, निलेश गडलिंग टाकळगाव, दशरथ दिघुरे कोंढा, शेख युनूस बाभुळगाव, मनिष मनवर बाभूळगाव, कार्तिक पोटभरे अंतरगाव, विक्रम टोथने नांदुरा, राजू राठोड नागरी, ज्ञानेश्वर मंगुळकर चेंडकापुर, शेख याकूब बाभूळगाव, जितेंद्र सावरकर गिमोना, गौरव मोहितकर वणी, संचित काळे वणी, सूर्यभान मानके कोपरा (जानकर), ऋषिकेश राठोड नागरी, अरुण मारकंड कोपरा (जानकर),. अमोल देवकर नांदुरा, गोविंदराव नवाडे चिखली, सागर डाहे, अमरावती, सुरेश बोरगे बारड, आकाश कांबळे कोपरा (बारड), गजानन वासे कोपरा (जानकर), सुनिल कावलकर गिमोणा, रितेश इंगोले गीमोना, यज्ञेश आगरकर पहूर, वेदांश चामटकर पहूर, मनिष लाकडे गीमोणा, राजेश कुंभेकर मांगुळ, मुस्तफा खान बाभुळगाव, राजिक अली कोपरा (जानकर), वसीम शेख बाभुळगाव, सुरेश गावंडे बाभुळगाव, प्रभाकर शेंडे राणी अमरावती, अन्नपूर्णा मडावी नांदुरा (बु), बखर काझी राणी अमरावती, पंकज दिघाडे दिघी, अक्षय नवाडे कोपरा, संजय कवडे गीमोना, हर्षद मानकर कोपरा (जानकर), निलेश वासेकर कोपरा (जानकर) यांसह इतरही बहुसंख्य वाचनप्रेमी ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहून ग्रंथ-भेट स्वीकारली.

Copyright ©