जि. प. शाळा चिकनी समस्या संशयाच्या विळख्यात
विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात !
जिल्हाधिकारी यांना निवेदन
यवतमाळ:- दारव्हा – तालुक्यातील चिकनी या गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक समस्याच्या समस्येने ठिय्या मांडला आहे. शाळेची शाळा व्यवस्थापन समिती केवळ पदा पुरतीच कार्यरत आहे यांचे सुद्धा समस्या कडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. गावातील लोकसंख्या पाहता लहान विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. गावातच शाळा असल्यामुळे भरपुर विद्यार्थी हे याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेताना दिसते. परंतु या शाळेची परिस्थिती पाहता असे निदर्शनास आले कि या शाळेच्या इमारतीतुन पाणी गळत आहे. थोडा जरी पाऊस आला कि वर्गामध्ये बसने कठीण होते व संपुर्ण वर्ग पाण्याने ओला होता. यामुळे अशावेळी सर्व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी बसवावे लागते. आणि शाळेमध्ये शिक्षकांची देखील कमतरता आहे. या विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण धोक्यात येताना दिसत आहे. या प्रकरणी गावकऱ्यांनी व युवकांनी शाळा व्यवस्थापन समिती ला सदर माहीती दिली. परंतु या समस्येवर शाळा व्यवस्थापन समिती ने तोडगा काढला नाही व सरळ दुर्लक्ष केलं. उद्याच्या पिढीचे भविष्य या लहानग्या विद्यार्थ्यांचा हातात आहे. जर यांचा पाया मजबुत नाही बनला तर हे विद्यार्थी घडतील कसे. या चिंतेने गावकरी व युवक संतप्त झाले. शाळा व्यवस्थापन समिती ला सांगुन सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं. यामुळे गावकरी व युवकांनी थेट जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांना शाळेच्या इमारत बांधकामाची सखोल चौकशी करून शाळेला शिक्षक उपलब्ध करून द्यावे अशी विनंती निवेदनामार्फत केली.
यावेळी, युवासंघ गृपचे सदस्य व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.
