Home Breaking News ग्रामीण पोलिसांची गावठी दारू हातभट्टीवर धाड

ग्रामीण पोलिसांची गावठी दारू हातभट्टीवर धाड

10

ग्रामीण पोलिसांची गावठी दारू हातभट्टीवर धाड

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत विविध ठिकाणी शेत शिवारात सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्यावर धाड टाकून कारवाई केली यात आरोपी अश्विन अशोक तिजारे वय 26 राहणार मार्तंड,यांच्या ताब्यातून मोहा माल सर्व गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे साहित्य असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तसेच यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत बेलोरा( रुई ) येथील आरोपी प्रफुल नामदेव भोयर वय 35 वर्ष ,रवी रावजी देवकते वय 24 वर्ष ,गजानन अवधूत खरात वय 42 वर्ष, तीनहि आरोपी राहणार बेलोरा ( रुई )असे तिघेही संगणमत करून बेलोरा शिवरात गावठी दारूची हातभट्टी मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली होती या बाबत पोलिसांना माहिती मिळताच धाड टाकून सर्व गावठी हातभट्टीची दारू व साहित्य असा एकूण 31 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तर भाब (राजा )परिसरातील किसन पांडुरंग रामटेके वय 60 वर्ष राहणार भाब ( राजा ) हा गावठी हातभट्टीची दारू विक्री व दारू गाळण्याचे काम करत असताना पोलिसांनी छापा मारला सदर इसम हा दारू गाळताना मिळून आला त्याच्या ताब्यातून गावठी दारू गाळण्याचे साहित्य समवेत 13 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी जप्त केला वेगवेगळ्या तीन ठिकाणी ग्रामीण पोलिसांच्या कारवाईने अवैद्य दारू व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे अनेक परिसरातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे या कारवाईत एकूण पाच आरोपी एकूण एक लाख 280 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदरची कामगिरी डॉ. दिलीप भुजबळ पाटील पोलीस अधीक्षक यवतमाळ, अप्पर पो. अ. खंडेराव धरणे संपतराव भोसले उपविभागी पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यवतमाळ पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे पोलीस उपनिरीक्षक कौरासे कैलास लोथे ज्ञानेश्वर मातकर, कुणाल पोलपिल्लेवार ,संदीप मेत्रे नितीन कोवे सचिन पातकमवार पवार गजानन गोडंबे अविनाश वाघाडे इत्यादी पोलिसांनी कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे

Copyright ©