Home यवतमाळ नाका पार्डी येथील दूषित पाण्याचा पुरवठा,ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

नाका पार्डी येथील दूषित पाण्याचा पुरवठा,ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

9

नाका पार्डी येथील दूषित पाण्याचा पुरवठा,ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

नाका पार्डी येथील मागील एक महिन्या पासुन दूषित पाणी पुरवठा होत असून येथील ग्रामस्थ दूषित पाणीच पीत आहे येथील ग्रामपंचायती च्या कारभारामुळे ,स्थानिक नागरिकांन कडून वारंवार सुचना देऊन सुद्धा स्थानिक प्रशासन लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे, दूषित पाण्यामुळे साथ रोगांचे प्रमाण वाढले आहे येथील नागरिकांना ताप, हागवन, ओकारी या सारख्या आजाराची लागवन होत आहे. शासन हर घर नल, हर घर जल योजना राबवीत आहे, जेणे करून लोकांना शुद्ध , व स्वछ पाणी पिण्यास मिळावे, परंतु या योजनेत सुध्दा सचीव ,सरपंच निवळ पैशाची मलई खाऊन ,लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. तरी या प्रकाराची दखल शासनाने लवकरात लवकर घेऊन होणाऱ्या दूषित पाण्याच्या पुरवठयात सुधारणा करण्यात यावी, नळ योजनेच्या पाईप मधून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे त्या मुळे कधीही अप्रिय घटना घडू शकते,कारण या गावात चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा तर नाहीच रुग्ण वाहिकाही वेळेवर उपलब्ध होत नाही त्या मुळे याची त्वरित दखल याला दोषी असणाऱ्या सचिवा विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

Copyright ©