Home यवतमाळ सुसंस्कार विद्या मंदिर येथे भरला चिमुकुल्यांचा पोळा

सुसंस्कार विद्या मंदिर येथे भरला चिमुकुल्यांचा पोळा

11

सुसंस्कार विद्या मंदिर येथे भरला चिमुकुल्यांचा पोळा

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण पोळा आहे.
शेतकरी राजाचा सखा सोबती म्हणुन त्याची ओळख आहे,पोळाल्या शेतकरी आपल्या बैलाची मनोभावे पुजा करतो ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. कृषिप्रधान या देशात, व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्व आहे.शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा हा दिवस मानाचा असतो.
तसेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ्याची लहान मुलं आतुरतेने वाट पाहत असतात. यासाठी ते तयारीही करतात. वेगवेगळ्या वेशभूषा धारण करण्यापासून बैलांना सजवण्यापर्यंत त्याची तयारी असते. यात आकर्षक वेशभूषा आणि नंदीला सजविले जाते . यामुळे मुलांना याची जास्त आवड असते. हाच धागा पकडुन सुसंस्कार विद्या मंदिरा मध्ये चिमुकल्यां साठी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले, ह्या मध्ये चिमुकल्यांनी शेतकरी राजाच्या तसेच मुलींनी लुगडे परिधान करित आकर्षक वेशभुषा केली,आपआपले बैल विविध कलाकुसरीने सजवित आपल्याच बैल कसा अव्वल राहील ह्यांची जणु स्पर्धाच लागली होती एकापेक्षा एक असे सरस असे मुलं आणि मुली शेतकऱ्यांच्या वेशभुषेमध्ये आली होती,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे ह्यांनी मुलांना पोळाच्या शुभेच्छा देत पोळ्याचे महत्व विशद करताना म्हणाल्या पोळा ह्या सणाची शेतकरी वर्षभर वाट बघत असतो आपल्या मालका प्रती प्रामाणिक असणाऱ्या बैलावर प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस होय,पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. या दिवशी बैलांचे कौतुक केलं जातं. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. या दिवशी बैलांचे खांद तुपाने किंवा हळदीने शेकले जातात. बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते.बैल पोळ्याचे महत्त्व बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो.असे त्या म्हणाल्या सरते शेवटी मुलांना त्यांनी पोळाच्या शुभेच्छा देत सर्वांना मिठाई चे वाटप करून पोळ्याची सांगता करण्यात आली. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्री- प्रायमरीच्या सौ.मनिषा ठाकरे,सौ.प्रांजली कोचे,सौ.प्रांजली रांखुडे,सौ.सपना सोनटक्के यांचे सहकार्य लाभले.

Copyright ©