Home यवतमाळ बोथ बोढन येथे एकशे एक बैल जोडी शेतकऱ्याचां सन्मान

बोथ बोढन येथे एकशे एक बैल जोडी शेतकऱ्याचां सन्मान

10

बोथ बोढन येथे एकशे एक बैल जोडी शेतकऱ्याचां सन्मान

माझं गाव फाऊंडेशनच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला यात बोथ बोढन येथे एकशे एक बैल जोडी शेतकऱ्याचां सन्मान करण्यात आला.
आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जातो. आज आपण इतर कोणत्याही व्यवसायात असलो तरी देशाचा कणा जेव्हा शेतकरी व शेतीचा विषय येतो तेव्हा आपण गर्वाने सांगतो की मी शेतकरी अथवा शेतकरी पुत्र आहे आणि त्याचा आपणास अभिमान देखील वाटतो. आपण सगळे आपल्या मातीशी व आपल्या गावाशी जुळलो आहोत म्हणून आपण हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला या वेळी प्रत्येक बैलाची पूजा करण्यात आली गावातील प्रमुख मान्य वरांसमवेत ग्रामस्थ उपस्थित होते प्रथमच माझं गाव फाऊंडेशन यांचे वतीने हा गौरव समारंभ प्रथमच राबविण्यात आल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे या वेळी प्रत्येक शेकाऱ्याना शेतकरी असल्याचा अभिमान जाणवत होता असा या वेळी उपकरण राबविण्यात आला
आपल्या शेतकरी बांधवांचा व ग्रामीण भागातील सर्वात मोठा सण म्हणजे *पोळा* आणि आपण हा सण मोठ्या आनंदात साजरा केल्या जातो ग्रामीण भागात सगळे सण, उत्सव आज हि ग्रामीण भागात जीवंत आहेत त्यातील पोळा म्हणजे आपल्या शेती कामासाठी शेतकरी बांधवा सोबत जीवाचे रान करणारी आपल्या घरची बैल जोडी. त्या मुक्या जनावरां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा सण साजरा करतो.
अलिकडच्या काळात बदलता निसर्ग व सरकारच्या धोरणामुळे शेती व जनावरांचे संगोपन करणे कठीण होऊन बसले आहे. २० वर्षा पूर्वी प्रत्येक गावा गावात खूप साऱ्या बैल जोडी होत्या परंतू आज शेतकऱ्याची परीस्थिती बिकट असल्याने दिवसेंदिवस गावात बैल जोड्यांची संख्या कमी होत चालल्या आहेत आणि ही बाब गंभीर आहे. अशाही विदारक परिस्थितीत, सगळ्या बाबीवर मात करीत आपले बरेच बांधव आपल्या बैल जोडीला परिवारातील सदस्या प्रमाणे जपून ठेवतात. आपल्या ग्रामीण संस्कृतीला व देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी आपल्या शेतात राब राब राबतात म्हणून आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे या वेळी आभार व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Copyright ©