Home यवतमाळ बँकेच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त, १२.३० होऊनही बँक बंदच,निराधार वृद्धानचां छळ

बँकेच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त, १२.३० होऊनही बँक बंदच,निराधार वृद्धानचां छळ

9

बँकेच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त,
१२.३० होऊनही बँक बंदच,निराधार वृद्धानचां छळ

यवतमाळ तालुक्या अंतर्गत भांब (राजा )येथील अलाहाबाद( इंडीयन )बँक येथील ३ महिने व्यावस्थापक गैर हजर असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित राहावे लागले, माजी जिल्हापरिषद सदस्य रेनुताई संजय शिंदे यांनी बँकेला कुलूप ठोकले जिल्हा अधिकारी यांचे कडे तक्रार केली कारवाई मात्र शून्य उलट आता तर बँक ही दुपार होऊनही उघडत नसल्याने ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, येथील बाहेर गावावरून निराधारांच् मानधन याच बँक मधून मिळत असल्याने अनेक वृद्ध उपाशापोटी बँकेसमोर तासन् तास वाट पहात बसत असल्याने जिल्ह्याला कुणी वाली आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या प्रकरणी कुणीही दखल घेत नसल्याने जनता त्रस्त झाली आहे.कधीच कुणाचे काम या बँकेत होत नाही अर्धे कर्मचारी उपस्थित असतात तर अर्धे सुट्टीवर यांना कुणी विचारणारे हि नाही का,,? असा प्रश्न जनतेला पडला आहे ,सर्व सामान्यांच्या समस्या ची कुणीही दखल घेत नसल्याने आपण पारतंत्र्यात तर नाही ना!असा सवाल सरपंच अनुप्रीया डीवरे यांनी केला तर सर्वसामान्य जनते कडून या कार्यप्रणाली वर तीव्र संताप वेक्त करण्यात येत आहे.

Copyright ©