दुचाकी अपघातात जे.सी.बी. ऑपरेटर चा मृत्यू
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रामगर जवळ एका पाण्याच्या खड्यात प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मंगरूळ का.ते बोरी गोसावी रस्त्यावर रामनगर येथील प्रवाशी निवाऱ्या च्या बाजूला पाण्याच्या खड्ड्यात येथील काही लोकांना प्रेत आढळून आले याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन ला देण्यात येताच ग्रामीण पोलीस स्टेशन चे भगवान बावणे,संजय राठोड,शंकर पेंदोर उमेश नेवारे यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता मृतक लाडखेड येथील जे. सी. बी.ऑपरेटर असल्याची माहिती मिळाली त्याचे नाव विशाल रमेश मेश्राम वय 30 वर्ष रा. लाडखेड हा मागिल २० तारखेपासून गायब असल्याची माहिती होती ,हा लाडखेड येथील विठोबा नामदेवराव टाके यांच्या मालकीची मोटर सायकल घेऊन जात असताना संतुलन गेल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वेक्त करण्यात येत आहे. मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणी करीता नेण्यात आले असून यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर जूनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे



