ललितकुमार वऱ्हाडे नि.ऊ.जि. यांचे हस्ते सायकली वाटप
महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय निरिक्षणगृह बालगृह यवतमाळ येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १७ ऑगष्ट २०२२ रोजी संस्थेतील अनाथ, निराधार, निराश्रित ( काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या) बालकांना सायकलीचे वाटप करण्यात आले. संस्थेस स्वयंपाकाकरीता इंडक्शन शेगडी आवश्यक असल्याने प्रमुख न्याय दंडाधिकारी बाल न्याय मंडळ मा. न्या. श्रीमती सुप्रिया वि. लाड यांचे हस्ते बालगृहाला भेट दिली.
मा. न्या. सुब्रमण्यम साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा न्यायालय यवतमाळ यांच्या भेटीदरम्यान संस्थेतील शाळेत जाण्याकरीता लोकसहभागातून सायकल उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले असता बाल कल्याण समिती सदस्य श्री. अनिल गायकवाड, यांनी बाल कल्याण समितीच्या माध्यमातून सर्वांना सायकल मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी समाज माध्यमाद्वारे घरी पडून असलेल्या जुन्या वापरण्यायोग्य सायकल अनाथ, निराधार, निराश्रित ( काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ) बालकांसाठी मिळवून देण्याची जबाबदारी घेतली.
त्याचे मित्र मंडळ यवतमाळकरांना समूहामध्ये हा मॅसेज व्हायरल केला असता अवघ्या २४ तासात मा. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी आपल्या कडील जीपापाड जपलेली किमान १०,००० कि.मि.पेक्षा जास्त स्वत: ज्या सायकलवर प्रवास केला ती सायकल आपली आठवण म्हणून भेट देवून उपक्रमाची स्वत:पासून सूरुवात केली. नंतर बाल कल्याण समिती सदस्य श्री. अनिल गायकवाड, यांनी स्वत: वापरत असलेली १ सायकल, प्राचर्य डॉ. जयंत चतुर वाधवानी महाविद्यालय, संजय ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता प्रत्येकी १ सायकल, पराग मुळे यवतमाळ ह. मु. कुवैत (परदेशात स्थायिक) २ नवीन सायकल, अमित खर्चे यवतमाळ ह. मु. मुंबई ४ नवीन सायकल, अशा एकूण १० सायकलीचे वाटप मा. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. प्रा. घनश्याम दरणे सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालय, स्वप्नील निलावार यांचे कडून प्रत्येकी १ सायकल प्राप्त होणार आहे.
सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी मा. ललितकुमार वऱ्हाडे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी बालकांना संबोधित केले असता परिस्थिती ही माणसाचे जीवनात यशस्वी होणेकरीता कधीच आड येत नसून परिस्थितीचा बाऊ न करता येणार्या अडचणी/समस्या यांना न घाबरता सामना करावा या स्थि आपले लहानपणीचे अनुभव कथन केले. लहानपणीच्या सायकलीशी संबंधित आठवणी बालकांना सांगून प्रत्येकाचे बालपण सारखेच असते असे प्रतिपादन केले. तसेच काही अडचण आल्यास शासन आपले पाठीशी असल्याचे सांगितले. शालेय जीवनात सायकल मिळाल्याचा आनंद बालकांचे चेहऱ्यावर ओसंडून वाहतांना दिसून आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख न्याय दंडाधिकारी बाल न्याय मंडळ मा. न्या. श्रीमती सुप्रिया वि. लाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, श्री वासुदेव डायरे अध्यक्ष, बाल कल्याण समिती, बाल कल्याण समिती सदस्य अनिल गायकवाड, अॅड. प्राची निलावार, श्रीमती वनिता शिरफुले, अॅड. लीना आदे, बाल न्याय मंडळ सदस्य राजू भगत, अॅड. काजल कावरे, परीविक्षा अधिकारी रवींद्र गजभिये, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, स्वप्नील ढोकणे, बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी, मीनल जगताप, अतुल सहारे सखी वन स्टॉप सेंटर कर्मचारी, वर्ग उपस्थित होते.
या प्रसंगी निरिक्षणगृह/बालगृहाचे अधिक्षक, गजानन जुमळे उपस्थित होते, परीविक्षा अधिकारी, राजू गौरकार, समुपदेशिका पूजा राठोड, शिक्षक संजय मोटे, लिपिक सुनील हारगुडे, काळजी वाहक अविनाश राऊत, आकाश खांदवे, मंगेश वाघाडे, प्रतिक जुमळे, आंनद पवार, इ. कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. निरीक्षण गृह /बालगृह प्रवेशित उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.
