सौ. योगीता बरलोटा यांचे 31 उपवासचे पचखान
यवतमाळ – खांदेश शिरोमणी तप महर्षी परमपुज्य गुरुदेव श्री अक्षय ऋषीजी म.सा. तेजस्वी मधुर व्याख्यानी पुज्य श्री अमृत ऋषीजी म.सा. नवदिक्षीत पुज्य श्री गितार्थ ऋषीजी म.सा. यांच्या अधिपत्याखाली सौ. योगीता मनोज बरलोटा यांनी मास क्षमन 30/31 उपवास साचे पचखान गुरुवार दि. 11 ऑगस्ट 2022 ला सकाळी 9.30 वाजता श्री मावजी देवजी निसर जैन धर्मस्थानक राजेंद्र नगर यवतमाळ येथे संपन्न झाले. तपस्वीच्या तपस्येची सकल जैन समाजात मुक्त कंठाणे प्रशंसा होत आहे. आपल्या 31 दिवसाच्या उपवासादरम्यान सौ. योगीता मनोज बरलोटा यांनी फक्त गरम पाण्याचे सेवन केले. या तपआराधनेबद्दल सौ. योगीता बरलोटा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
