महादेवाच्या पिंडीला तिरंग्याच्या रूपांनी साजविले.
आज आपल्या भारत देशाचा 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला आणि त्याच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आज श्री क्षेत्र मनदेव येथील शिवगण मित्र परिवारा तर्फे श्री क्षेत्र मनदेव देवस्थानात महादेवाची पिंड ही आपल्या भारतीय तिरंग्याच रूप देवून सजवण्यात आली होती,व तसेच मंदिराचा गाभारा, मंदिराच्या परिसराची स्वच्छता करून सजावट करण्यात आली होती. सकाळी 5 वाजता भगवान शंकराच्या पिंडीचा अभिषेक करून,भारत माता की जय, वंदे मातरम्, हर हर महादेव चे नारे देत पहाटे पूजा व अभिषेक करुन आरती करण्यात आली होती. तेथील संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झालं होत. शिवगण परिवाराची विशेष ओळख म्हणजे सर्व युवा पिढीचा असलेला एकोपा, एकजूट आणि संपूर्ण सहमतीने असलेले कार्य आणि याच एकजूटपणा व एकमतामुळे हा परिवार नेहमीच नवनवीन सामाजिक व सर्व मानव जातीला असलेले हिताचे उपक्रम राबवीत असतो जसे की वृक्षारोपन, रक्तदान शिबिर, उन्हाळ्यात गैर सोय नाही व्हावी म्हणुन उभारलेली पाणपोई, मुक प्राण्याची असलेली सेवा, स्वच्छता अभियान राबवित असते आणि याच अश्या निरनिराळ्या राबवीत असलेल्या उपक्रमा मुळे हा शिवगण वर्ग नेहमी चर्चेत असतो व सर्वत्र त्यांच कौतुक होत असते आणि या शिवगण परिवाराचा एकच उद्देश की देशातील युवा वर्गाने या सर्व गोष्टीचा आदर्श घ्यायला पाहिजे. आणि ही सेवा प्रत्येक युवा पिढीला एक प्रेरक ठरली पाहिजे जेणेकरून युवा पिढी वर्ग याच शिवगण परिवारा सारखे विविध उपक्रम राबून,स्वतः सक्षम होऊन दुसऱ्याच्या मदतीला हाथ समोर करणारे झाले पाहिजे,असा हि संदेश यावेळी देण्यात आला.
