Home यवतमाळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त शासकीय आश्रमशाळा हिवरी येथे वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त शासकीय आश्रमशाळा हिवरी येथे वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण

9

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त शासकीय आश्रमशाळा हिवरी येथे वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समाजामध्ये वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाच्या जनजागृतीकरीता शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हिवरी तथा हिवरी येथील वनविभागाच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयापासून निघालेल्या वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी ‘झाडे लावा झाडे जगवा’ पर्यावरणाचे रक्षण करा’ सामाजिक संदेश विद्यार्थ्यांनी दिला .विद्यार्थांसह वनाधिकारी शाळेचे प्राचार्य शैलेंद्र मिश्रा, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे साहेब तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व वन कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले होते. वृक्षदिंडीच्या समारोपानंतर शाळेत वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपन कार्यक्रमात विद्यार्थ्यी- शिक्षकांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक शैलेंद्र मिश्रा,विनोद क्षिरसागर, सविता राठोड, भास्कर हंबर्डे, संतोष शेणमारे, दिपाली देशमुख, सारिका हांडे, अनिता खाटकर, रंजना भोयर, भगवान तुमसरे, सुनिता काकपूरे, आशा सावरकर, संगिता कुळसंगे, संजय भुजाडे,निखिल मडावी, कैलास पवार तसेच क्षेत्र सहाय्यक एन.व्ही.तांबारे, वनरक्षक व्ही.सी.कैथवास इ.वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©