इंडीयन स्मार्ट सिंगर अवॉर्ड ने सुनिल चव्हाण सन्मानित
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव च्या निमित्ताने जीवन ज्योत कला प्रतिष्ठान महाराष्ट्र व जगदंबा संस्था परभणी यांचे वतीने दि.13 आगस्त 2022 रोजी उत्तुंग भरारी .शैक्षणिक . कला व सामाजिक परिषदेचे आयोजन बी.रघुनाथ सभागृह परभणी येथे करण्यात आले होते .महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात स्वबळावर कार्यरत राहून सामाजिक कार्य व समाज प्रबोधन करणाऱ्या कार्य वीरांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात माळे गाव ता.आर्णी येथील सुप्रसिद्ध गायक तथा सिनेकलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण यांना अभिनेते किशोर महाबोले यांचे हस्ते इंडीयन स्मार्ट सिंगर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्याचे अध्यक्ष श्री के.बी. दडके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सौ विद्या ताई चौधरी डॉ गोपाल जी ढोमने हे होते .पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीची निवड श्री एम एम शेख यांनी केली तर आयोजन बाल किसन खरात यांनी केले या वेळी बरीच मंडळी हजर होती .सुनिल चव्हाण यांनी स्त्री व पुरूष च्या आवाजात गीते सादर करून वाह वाह मिळवली
