पावसाळयाच्या तोंडावर पाईप लाईन टाकल्याने रस्ता झाला चिखलमय,जीव मुठीत घेऊन काढावी लागते वाट,
गरोदर माताचा जीव धोक्यात सरपंच,उपसरपंच यांची बघ्याची भूमिका
यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत हिवरी ग्रामपंचायती च्या दुर्लक्षित पणामुळे झोपडपट्टी वाशियाचे आरोग्य तर धोक्यात आलेच मात्र गरोदर मातांचे जीवही धोक्यात आले आहे, ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला हर घर नल या योजनेची सुरुवात करण्यात आली जेसिब च्या माध्यमातून नाली खोदून पाईप लाईन टाकण्यात आली त्या वेळी खोदण्यात आलेली माती रस्त्यावर टाकल्याने हा परिसर पुर्णतः चिखल मय झाला असल्याने येथील झोपडपट्टी वाशिया ना चालणे कठीण झाले आहे,जी पाईप लाईन टाकण्यात आली ती पाईप लाईन रस्त्याच्या काठानी टाकल्याने या पाईप लाईन ची मर्यादा रस्ता दुरुस्ती पर्यंतच राहणार आहे हा प्रकार सुरू असताना संबंधित अभियता तर फिरकला तर नाही च मात्र सरपंच उपसरपंच यांनी बघ्याची भूमिका घेतली हि भूमिका का ? घेतली हा प्रश्न अनुत्तरितच आहे ,याच वॉर्डातील नवीन नाली बांधकाम करण्या करीता टेंडर लावण्यात आले तेथील कामही सुरू केले मात्र नवीन नाली न करता जुनीच नाही दुरुस्त करण्यात आल्याचा जिवंत प्रकार हिवरी येथे घडला आहे या नालीचे पाणी साचून येथील ग्रामस्थांना अनेक आजाराचा सामना करावा लागतो आणि ठेकेदार पाच लाखांचे काम एक लाखात करून हात वर करीत असल्याने येथील बांधकामात होत असलेल्या गैर प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रावाशीयांनी केली आहे.
