Home यवतमाळ श्री. बालाजी मंडळ दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा मोटर सायकल...

श्री. बालाजी मंडळ दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा मोटर सायकल रॅलीने यवतमाळकरांचे लक्ष वेधले

7

श्री. बालाजी मंडळ दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा मोटर सायकल रॅलीने यवतमाळकरांचे लक्ष वेधले

यवतमाळ – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत श्री बालाजी मंडळ दुर्गादेवी उत्सव बालाजी चौक यवतमाळच्या वतीने आज दुपारी 4 वाजता भव्य तिरंगा मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला तिरंगा ध्वजा दाखवून श्री बालाजी मंडळ दुर्गादेवी उत्सव मंडळ बालाजी चौक मंडळ यवतमाळचे संस्थापक अध्यक्ष व नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सुभाषभाऊ राय यांनी रॅलीला सुरुवात केली.
बालाजी चौक यवतमाळ येथून सुरु झालेली हि मोटर सायकल रॅली शिवाजी चौक, लोखंडी पुल, तहसिल चौक, नेताजी चौक, दत्त चौक, संविधान चौक, पाचकंदिल चौक, इंदिरा गांधी मार्केट, हनुमान आखाडा चौक, अप्सरा टॉकीज शिवाजी चौक, या शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत बालाजी चौक येथे ह्या दिव्य भव्य मोटर सायकल रॅलीचे समारोप झाले. या विशाल रॅलीचे नेर्तृत्व रॅलीचे संयोजक विजय राय यांनी केले. या रॅलीमध्ये अशोकभाऊ बुटले, देविलालजी श्रिवास्तव, विठ्ठल भोयर, नाना हर्षे, दिलीप श्रीवास, प्रफुल जयस्वाल, सोनु राय, लकी राय, करण राय, भारत श्रीवास, राकेश श्रिवास, नितीन डगवाल, जिवन श्रीवास, संजय शर्मा, दुर्गेश पातालबंशी, निखील छांगाणी, लकी छांगाणी, सोनू चांडक, देवू खंदाडे, अनिल शर्मा, गोपाल शर्मा, प्रेमचंद शर्मा, अनिल कट्यारमल, प्रदिप तोटे, दिलीप तेलंग, जावेद मवाल, विनोद शर्मा, अनिल चुरा, गोविंद मोर, विनोद शर्मा, मुन्ना सागर, महेंद्र पाखरे, श्याम दानव, संजय तायडे, राहूल यादव, राहूल श्रीवास, सुमित गावंडे, प्रथम मिठे, देविदास शर्मा, गौरव मिसाळ, आदिंसह श्री बालाजी मंडळाचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते या तिरंगा मोटर सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Copyright ©